Badlapur Firing Video Saam tv
क्राईम

Badlapur Crime: मित्रांमध्ये पैशातून वाद अन् गोळीबाराचा थरार, बदलापूर फायरिंग प्रकरणात मोठा खुलासा, १ अटकेत

Badlapur Latest News: चार जणांमध्ये झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती रेल्वे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, ता. ६ सप्टेंबर

Badlapur Station Firing Update: बदलापूर स्टेशनमध्ये गुरुवारी सायंकाळी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. प्रवाशांची गर्दी असतानाच झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून या गोळीबाराचे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. पैशावरुन झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बदलापूर स्थानकात झालेल्या गोळीबार प्रकरणी आता एक महत्वाची अपडेट समोर आली असून पैशाच्या वादातून मित्रानेच मिळावर गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. चार जणांमध्ये झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती रेल्वे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर स्टेशनबाहेर चौघे जण आले होते. पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला व त्यातून फायरिंगची घटना घडली. चौघेही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत. गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळा पोलीस ठाणे, दोन गुन्हे उल्हासनगर मध्ये दाखल आहेत. दरम्यान, पैशांच्या देवाण-घेवाण आणि पैशांचा वाटपावरून अचानक त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचे पर्यावसन गोळीबारात झालं दोन राऊंड फायर करण्यात आले असून त्याने बंदूक कुठून आणली? याचा तपास सुरू आहे.

हातभट्टी अड्ड्यावर अमरावती पोलिसांची धाड

महाराष्ट्र- मध्यप्रदेशच्या सीमेवर हिरादेही जंगल परिसरात सुरू असलेल्या हातभट्टी दारू अड्यावर अमरावतीच्या ब्राह्मणवाडा थळी व आटनेर पोलिसांनी धाड टाकून अवैध दारू भट्टीचा अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत चार लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करीत नष्ट करण्यात आला आहे. आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळी एस्टन एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये जनरेटरला आग

Kitchen Hacks : जळलेला नॉन स्टिक तवा कसा साफ करावा? फॉलो करा या टिप्स, पुन्हा मिळेल नव्यासारखी चमक

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT