Mumbai crime  Saam tv
क्राईम

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

Mumbai crime news : छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले. यामुळे त्यांनी तब्बल हजारो रुपये गमावले. त्यानंतर सायबर ठगांकडून पोलिसांनी संपूर्ण रक्कम वसूल केली.

Saam Tv

अभिनेता गजेंद्र चौहान ऑनलाइन फसवणुकीला बळी पडले

बनावट डी-मार्ट फेसबुक जाहिरातीमुळे त्यांची 98 हजारांची फसवणूक झाली

या प्रकरणात ओशिवरा पोलिसांच्या सायबर सेलने तात्काळ कारवाई केली

संजय गडदे, साम टीव्ही

दूरदर्शनवरील गाजलेल्या महाभारत मालिकेत युधिष्ठिराची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गजेंद्र चौहान यांची फेसबुकवरील बनावट डी-मार्ट जाहिरातीद्वारे ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. सायबर ठगांनी त्यांच्या बँक खात्यातून 98 हजार रुपये उकळले. मात्र ओशिवरा पोलीस ठाण्याच्या सायबर सेलने गोल्डन अवरमध्ये तात्काळ कारवाई करत संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,10 डिसेंबर 2025 रोजी फेसबुकवर स्वस्त दरात ड्रायफ्रूट उपलब्ध असल्याची डी-मार्टची जाहिरात पाहून गजेंद्र चौहान यांनी संबंधित लिंकवर क्लिक केले. ऑर्डरसाठी आलेला ओटीपी टाकताच काही वेळातच त्यांच्या HDFC बँक खात्यातून 98 हजार रुपये वजा झाल्याचा संदेश प्राप्त झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक आनंद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे, सहा.फौ. अशोक कोंडे आणि पोलीस शिपाई विक्रम सरनोबत यांनी नॅशनल सायबर पोर्टल 1930 वर तक्रार नोंदवली. तपासात फसवणुकीची रक्कम Razorpay मार्फत Croma कडे वळती झाल्याचे स्पष्ट झाले.

सायबर सेलने तात्काळ संबंधित बँक आणि पेमेंट गेटवेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रक्कम होल्ड केली. जलद आणि कौशल्यपूर्ण कारवाईमुळे 98 हजार रुपयांची संपूर्ण रक्कम फिर्यादीला रिफंड करण्यात आली. ओशिवरा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

SCROLL FOR NEXT