इंदूर : सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरणातील तपासादरम्यान नवीन खुलासे समोर येत आहेत. शिलाँगमधील त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. सुमारे चार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रकारच्या शंका उपस्थित होत आहेत. पोलिसांच्या तपासादरम्यान सापडलेला रेनकोट सोनमने घातलेला दिसतो. नंतर ती रेनकोट काढून स्कूटरमध्ये ठेवते. यानंतर, दोघेही काहीवेळ हॉटेलच्या बाहेर राहतात. यादरम्यान सोनम तिच्या फोनमुळे थोडी काळजीत दिसते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनम आणि राजा कुठेतरी जाणार असल्याचं दिसत आहे. राजा स्कूटीवर बसला आहे. पांढऱ्या पोशाखात असलेली सोनम तिचा मोबाईल घेऊन स्कूटीपासून थोडी दूर जाते. तिथे नेटवर्कची समस्या असू शकते असा अंदाज लावला जात आहे. सोनम कोणालातरी फोन लावण्यावरुन टेन्शमध्ये दिसतेय. ती फोन घेऊन दोनदा स्कूटीपासून थोडी दूर जाते.
यानंतर, सोनम पुन्हा राजाजवळ येते आणि फोनवर काहीतरी दाखवते. राजा फोनमध्ये काहीतरी पाहतो. यानंतर, दोघेही स्कूटीवरून फिरायला जातात. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की सोनम तिथून कोणाला फोन करत होती. सोनमने तिच्या सासूशी झालेल्या संभाषणादरम्यान सांगितलं होतं की येथे नेटवर्कची समस्या आहे. फोन मोठ्या अडचणीने कनेक्ट होत आहे. अशा परिस्थितीत, असा अंदाज लावला जात आहे की कदाचित सोनम कोणाला फोन करत असेल.
पोलिसांच्या तपासात हे सीसीटीव्ही फुटेज खूप महत्त्वाचं ठरू शकतं. यात काही गोष्टी अशा आहेत, ज्यामुळे आरोपींविषयी माहिती मिळू शकते. तसेच, काही प्रश्नही उभे राहिले आहेत. सोनमचा रेनकोट स्कूटीमध्ये होता, तर तो बाहेर कसा सापडला? तोही स्कूटीपासून खूप लांब होता. त्यामुळे तिच्या घरच्या लोकांना याबाबत अनेक शंका आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, तिथली पोलीस त्यांना मदत करत नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.