Madhya Pradesh BJP Leader Death:  Saamtv
क्राईम

BJP Leader Death: मोठी बातमी! इंदोरमध्ये भाजप नेत्याची हत्या, भगवा यात्रेची तयारी करत असताना झाडल्या गोळ्या; आरोपी फरार

Gangappa Pujari

मध्यप्रदेशमधील इंदोरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मोनू कल्याणे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष होता. तसेच तो मध्यप्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचा निकटवर्तीय होता.

भाजप युवा मोर्चाचा शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे याची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शहरातील एमजी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणबाग परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून पियुष आणि अर्जुनने मोनू कल्याणेवर गोळ्या झाडल्या. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे

मोनू कल्याणे हा शनिवारी रात्री भगवा यात्रेच्या तयारीत होता. याचवेळी पियुष आणि अर्जुन नावाचे दोन युवक दुचाकीवरून चिमणबाग चौकात पोहोचले. दुचाकीवर बसून दोघेही मोनूशी चर्चा करू करत होते. अशातच दुचाकीवर मागे बसलेल्या अर्जुनने पिस्तुल काढून मोनू कल्याणे यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, इंदूर विधानसभेच्या राजकारणात सक्रिय असणारा मोनू कल्याणे हे कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. या दुर्घटनेनंतर विजयवर्गीय यांचा मुलगा आणि इंदूर विधानसभेचे माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांनी त्यांच्या समर्थकांसह मृताच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT