Madhya Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशमध्ये एका तरुणाने बायको आणि दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केली. धावत्या ट्रेनसमोर उडी मारून त्याने आयुष्य संपवलं.

Priya More
  • मध्य प्रदेशातील मोरेना येथे धक्कादायक घटना

  • तरुणाने बायको आणि दोन मुलांची हत्या केली

  • त्यानंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली

  • पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू

मध्य प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली. तरुणाने बायको आणि दोन मुलांची हत्या करून नंतर आत्महत्या केली. धावत्या ट्रेनसमोर उडी मारून त्याने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे मध्य प्रदेश हादरले. मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यातील मटाबसैया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शनिवारी सकाळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय बलरामने त्याची २८ वर्षीय बायको रविता, १० वर्षीय आरव आणि ७ वर्षीय मुलगा अतुल यांची हत्या केली आणि त्यानंतर रल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी चारही जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की, नवरा-बायकोमध्ये बऱ्याच काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता. रविता काही काळ तिच्या माहेरी राहत होती आणि अवघ्या दोन दिवसांपूर्वीच ती सासरच्या घरी परत आली होती. यानंतर कुटुंबात नेमके काय घडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबातील सदस्यांची आणि जवळच्या लोकांची चौकशी केली जात आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेचे खरे कारण शोधण्यासाठी सर्व बाबींचा तपास केला जात आहे. कुटुंबीय आणि जवळच्या रहिवाशांची चौकशी केली जात असून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यावरच नेमके कारण आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. गावात मोठी गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परांडा शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या अन् दगडफेकीने भर चौकात गोंधळ

Tilache Laddu Recipe: थंड वातावरणात झटपट बनवा शरीराला उब देणारे पौष्टिक तिळाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

Turmeric Milk Benefits : रात्री हळदीचं दूध प्यायल्यानं शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या

Rahul Gandhi Video: पूरी दाल ही काली है...राहुल गांधींची मोठी घोषणा; मोदी सरकारचं टेन्शन वाढणार

भाजपच्या दिग्गज युवा नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT