मध्य प्रदेशमध्ये महिला प्रवाशावर बस कंडक्टरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्वाल्हेरमध्ये ही घटना घडली. बस कंडक्टरने महिला प्रवाशाला बसमध्ये ओलीस ठेवत तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी भिंड येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत ही भयंकर घटना घडली. ग्वाल्हेर बस स्टँडवर ही महिला आली होती. तिला दोन वर्षांचा मुलगा आहे. पीडित महिलेचे लग्न शिवपुरीमधील एका व्यक्तीसोबत झाले होते. नवऱ्यापासून ही महिला वेगळी झाली असून याप्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे. कोर्टाची तारीख असल्याने महिला ग्वाल्हेरला आली होती. पण तिचा नवरा ठरलेल्या तारखेला कोर्टात हजर राहिला नाही. त्यामुळे ती ग्वाल्हेर बस स्टँडवरून शिवपुरीला जाणाऱ्या बसमध्ये चढली.
या प्रवासादरम्यान महिलेची भेट बस कंडक्टर विष्णू ओझाशी झाली. आरोपीने आपण गुणा येथील रहिवासी असल्याचे महिलेला सांगितले. यावेळी कंडक्टरशी बोलताना महिलेने त्याला सांगितले की, ती संध्याकाळी शिवपुरीहून ग्वाल्हेरला परत येणार आहे. त्यानंतर कंडक्टरने तिला भिंडला परत सोडण्याचे आश्वासन देत तिचा मोबाईल नंबर घेतला. संध्याकाळी कंडक्टरने महिला प्रवाशाला फोन केला आणि तिला ग्वाल्हेरला येण्यास सांगितले.
महिलेने काम पूर्ण झाल्यानंतर ती घरी परत जायचे असल्याने बस स्टँडवर आली. आरोपी विष्णूच्या बसमध्ये ती चढली आणि ग्वाल्हेर बस स्टँडवर पोहोचली. ग्वाल्हेरमधील बस यार्डमध्ये आल्यानंतर आरोपी कंडक्टरने तिला भिंड येथे सोडण्याचे आश्वासन दिले आणि बसमध्येच थांबण्यास सांगितले. बसमधील सर्व प्रवासी उतरल्यानंतर आरोपी कंडक्टरने बसचे गेट बंद केले. त्यानंतर त्याने महिला प्रवाशावर बलात्कार केला आणि नंतर पळ काढला.
या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित महिलेने पोलिस ठाण्यात जाऊन तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपी बस कंडक्टर विष्णू ओझाला अटक केली. आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे आणि सध्या त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डबद्दलची माहिती पोलिस गोळा करत आहे. या घटनेमुळे ग्वाल्हेरमध्ये खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.