Crime Saam tv
क्राईम

संतापजनक ! ४० वर्षाचा नराधम चिमुरडींना बनवायचा शिकार; मुलीवर अत्याचार केल्यानंतर पाप धुण्यासाठी कुंभमेळ्यात गेला अन्...

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशातील पोलिसांनी १६ दिवसांच्या शोधानंतर एका मुलीवरील बलात्कार आणि हत्येचा आरोपी पकडला आहे. ४० वर्षीय आरोपी पूर्वीही बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात गेला होता.

Dhanshri Shintre

मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. यापूर्वी २००३ मध्ये आरोपीने चक्क ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्या प्रकरणामध्ये त्या आरोपीला १० वर्षांची तुरुंबवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१३ मध्ये शिक्षा भोगून आरोपी बाहेर आला.

क्रुरतेचा कळस! आरोपी बाहेर येऊन त्यानी आष्टा (सिहोर) येथील एका ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणात त्या आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली. ओळख परेडमध्ये मुलीसोबत तिचे वडीलही उपस्थित होते आणि त्यामुळे मुलीला आमिष दाखवले जाऊ शकते या कारणावरून त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले. १ फेब्रुवारी २०२५ रोजी नरसिंहगड (राजगड) येथे ११ वर्षांच्या मूकबधिर मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी रमेशला अटक केली आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी ११ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी तपास सुरू केला. पोलिसांनी ७९ संशयितांची चौकशी केली आणि ७०० हून अधिक फोन नंबर ट्रॅक केले. आरोपीचे वर्णन मिळाल्यानंतर, पोलिसांनी नरसिंहगड बस स्टँडवर लाल शाल घातलेल्या, निळ्या-काळ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज घालणाऱ्या व्यक्तीला पाहिले. एक ऑटो चालकाने पोलिसांना सांगितले की आरोपी संध्याकाळी ६ वाजता नरसिंहगडला पोहोचला होता.

पोलिसांच्या तपासानंतर समजले की आरोपी कुंभमेळ्याला गेला होता. आरोपी १६ आणि २७ वर्षांच्या दोन मुलांचा पिता आहे, ज्यांच्यावर त्याची वाईट नजर होती. बलात्कार आणि हत्येच्या आरोपीला पकडण्यासाठी १६ पथकं तपासात गुंतली होती. बुधवारी सकाळी आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी ९ जिल्हे आणि १७ रेल्वे स्थानकांवर शोध घेतला.

१६ दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात यश मिळालं. त्याच्या शोधात ४०० तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिसांनी शाजापूर, उज्जैन, नीमच, रतलाम, प्रयागराज, जयपूर, भोपाळ, विदिशा आणि सिहोरमध्ये छापे टाकले, पण आरोपी त्याचे ठिकाण वारंवार बदलत होता. आरोपी रमेश २००३ ते २०१३ दरम्यान तुरुंगात होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT