LUCKNOW CHARBAGH FIRST AC PASSENGER LUGGAGE STOLEN, EMERGENCY CHAIN IGNORED 4 TIMES saam tv
क्राईम

"फर्स्ट AC मध्येही सुरक्षित नाही" महिलेचे लाखोंचे दागिने गायब, TTE-RPF कडून मदतीचा साधा हातही नाही

Lucknow Charbagh Station : लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकावर फर्स्ट एसी कोचमध्ये प्रवाशाच्या सामानाची चोरी झाल्याची आणि मदतीसाठी चार वेळा इमर्जन्सी चेन ओढूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याची घटना समोर आली आहे.

Saam TV News

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील चारबाग रेल्वे स्थानकावर एक संतापजनक घटना घडली आहे. आनंद विहार ते न्यू जलपाईगुड़ी एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या बॅगमधून सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख चोरीला गेल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे रेल्वेच्या प्रीमियम डब्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चार वेळा चैन ओढूनही मिळाली नाही मदत

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा महिला प्रवाशाला आपल्या सामानाची चोरी झाल्याचे समजले, तेव्हा तिने तातडीने ट्रेन थांबवण्यासाठी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी तब्बल चार वेळा इमर्जन्सी चेन ओढली. परंतु, महिलेचा दावा आहे की चेन ओढूनही ट्रेनमधील कोणताही टीटीई TTE किंवा आरपीएफ RPF जवान मदतीसाठी पोहोचला नाही. तसेच रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी तिथूनही तत्काळ कोणतीही मदत मिळाली नाही.

अखिलेश यादव यांनी सरकारला धारेवर धरले

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, यामध्ये महिला अत्यंत हताश होऊन तीच्यासोबत घडलेली घटना सांगताना दिसत आहे. फर्स्ट एसीसारख्या प्रीमियम आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोचमध्ये जर महिला सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणावरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. 'भाजप राजमध्ये गुन्हेगार मोकाट फिरत आहेत आणि महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली गेली आहे,' असे म्हणत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :भाजपमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत

Shocking : "३ हजार दे आणि...." स्पा सेंटरच्या नावाखाली भलतेच धंदे, पोलिसांनी धाड टाकताच धक्कादायक प्रकार उघड

भाजपच्या बड्या नेत्याचा दारूण पराभव, शंभूराज देसाईंचा विजय, जयकुमार गोरेंनीही गुलाल उधळला, सातारा बँकेत कोण-कोण जिंकलं?

Income Tax Deadlines : नोव्हेंबरमध्ये करदात्यांना मोठा झटका! या ५ तारखा चुकवल्या तर भरावा लागेल दंड

Juice For Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतील 3 ज्यूस; रोज पिण्याची सवय लावाच

SCROLL FOR NEXT