parbhani lcb arrests police accpeting 10 thousand bribe saam tv
क्राईम

Parbhani Crime News : सहायक उपनिरीक्षकाला दहा हजारांची लाच घेताना पकडले, नानलपेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Parbhani Latest Marathi News : परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यात पाेलिस अधिकारी याने लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश काटकर

Parbhani :

परभणी जिल्ह्यात सहायक उपनिरीक्षकाला दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. परभणी एसीबी पथकाने उपनिरीक्षकावर कारवाई केली. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परभणीत तक्रारदाराच्या भावजीच्या एमएलसी जबाबाचे केलेल्या कामाबद्दल सहायक उपनिरीक्षक संजय मुंढे याने दहा हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत एलसीबी कार्यालयात धाव घेतली.

त्यानंतर एलसीबीने नवा मोंढा पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक संजय मुंढे याच्यावर सापळा रचला. परभणीच्या एसीबीच्या पथकाने मुंढे यास लाच घेताना रंगेहाथ पकडले. या लाचखोर पोलीस अधिकाऱ्यावर परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यात लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, 3, 5 आणि 8 रूपयांची नुकसान भरपाई

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली, काय निर्णय झाला? VIDEO

SCROLL FOR NEXT