- शुभम देशमुख
भंडारा जिल्ह्यात वादळी पावसामुळे शेत शिवाराबराेबरच घरांचे, मंडपाचे माेठं नुकसान झालं आहे. वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या (bhandara gondia lok sabha election) तयारीकरिता लावण्यात आलेला मजबूत टेन्ट वादळाने मोडून अक्षरशः खाली कोसळला. यामुळे टेन्ट पुन्हा उभा करावा लागणार आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार वादळासह हजेरी लावून झोडूपन काढले. वेगवान वाऱ्याने कुठे लग्नघरचे मांडव उखडले, झाडे कोसळली तर खांबे वाकली इतका वाऱ्याचा प्रचंड वेग होता. विशेषता नाकाडोंगरी, गोबरवाही, सिहोरा भागासह तुमसर शहराला वादळाचा फटका बसला.
नाकाडोंगरी परिसरात जोरदार वादळासह पावसाने हजेरी लावली. तुमसर येथे तब्बल अर्धा ते पाऊण तास वादळी पावसाने कहर केला. पावसापूर्वीच्या जोरदार वादळाने नागरिकांची त्रेधा उडविली. कौलारू घरावरचे छप्पर, टिनाचे पत्रे उडाले तर प्लास्टिक ताडपत्र्या फाटून पार ऐसीतैसी झाली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुसळधार पाऊस बरसल्याने शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी होते. तुमसर तहसील कार्यालयपरिसरात लोकसभा निवडणुकीच्या तयारीकरिता लावण्यात आलेला मजबूत टेन्ट वादळाने मोडून अक्षरशः खाली कोसळला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.