Akola Crime Saam tv
क्राईम

Akola Crime : गुन्हेगारांची मस्ती पोलिसांनी उतरवली, वर्षभरासाठी कारागृहात केलं स्थानबद्ध

Crime News : अकोला शहरातील खदान परिसरातील दोन कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना एक वर्षासाठी तुरुंगात पाठवले.

Alisha Khedekar

अक्षय गवळी, अकोला

अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अकोला पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू आहे. एमपीडीए कायद्यानुसार शहरातल्या खदान पोलीस स्टेशन हद्दीतील २ कुख्यात गुन्हेगारांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. त्यांना एमपीडीए कायद्याअंतर्गत थेट तुरुंगाची हवा दाखवण्यात आली आहे. दरम्यान, २८ वर्षीय करीम खान उर्फ बबलु अन्वर खान आणि ३३ वर्षीय अक्रम बेग इमाम बेग असे या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

अकोला शहरात वारंवार इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, आगळीक करणे, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे, अंमली पदार्थ विक्री करणे, अश्लील कृती करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने, अपमान करणे, धाकदपटशा करणे, असे बरेच गंभीर गुन्हे करीम खान उर्फ बबलु अन्वर खान याच्यावर दाखल आहेत.

तर कुख्यात गुंड अक्रम बेग इमाम याच्यावर यापूर्वी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, आगळीक करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धाकदपटशा करणे, अश्लील शिवीगाळ करणे, बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणे, गैरनिरोध करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींवर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई केली गेली होती, परंतु त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता.

अखेर पुन्हा गंभीर दखल घेत दोन्ही कुख्यात गुंड करीम खान उर्फ बबलु अन्वर खान आणि अक्रम बेग इमाम बेग यांच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा म्हणून त्यांना एक वर्षासाठी कारागृहस्थानबद्ध करण्यात आले. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके, माजीद पठाण, ज्ञानेश्वर सैरिसे तसेच पोलीस स्टेशन खदान येथील ठाणेदार मनोज केदारे, नितीन मगर, निलेश खंडारे, संजय वानखडे, अमित दुबे यांनी या कारवाईसाठी परिश्रम घेतले. दरम्यान, अकोला पोलिसांच्या या कठोर कारवाईनंतर सराईत गुन्हेगार व गुंडांना या कारवाईचा चांगलाच धसका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT