Latur Latest News: Saamtv
क्राईम

Latur News: घरची गरिबी, मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण घेता येईना, ५ वर्षांच्या चिमुकलीसह आईने आयुष्य संपवलं; लातूर हळहळलं!

Latur Latest News: मुलीला इंग्रजी माध्यमांत शिक्षण घेता येत नसल्याने निराश झालेल्या आईने ५ वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

संदिप भोसले| लातूर, ता. २० जून २०२४

मुलीला इंग्रजी शाळेत शिक्षण घेता येत नसल्याने आईने पाच वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक अन् मन सुन्न करणारी घटना लातूर जिल्ह्यात घडली. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील माळेगाव (कल्याणी) येथे एका विहिरीत माय-लेकीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाग्यश्री व्यंकट हालसे वय( 26 )आणि समीक्षा व्यंकट हालसे वय (5) असे मृत आई आणि मुलीचे नाव आहे.

सीबीसी शाळेत आपल्या मुलांना शिक्षण घेता येत नसल्याने या नैराश्यातून आईने आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत विहिरीत उडी घेत जीवन यात्रा संपवल्याचे सांगण्यात येत आहे. आता याप्रकरणी मृत भाग्यश्री हालसे यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून औराद-शहाजनी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरात पती- पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; नागपुरमधील घटना

दरम्यान, नागपूर शहरातील सेमिनरी हिल्स परिसरात एअर फोर्समधील कर्मचारी आणि पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. राहत्या घरात दोघांचेही मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्याच्या बाणेरमधील रस्ता वाहतुकीसाठी ठप्प

AC: एसी वापरूनही वीज बिल येईल कमी; फक्त 'या' ६ टिप्स वापरा

Laxman Hake : आमच्या ४ पिढ्या घाबरल्या, पण आता बोलणार, आंदोलन करणार; लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

The Bads Of Bollywood Premiere: आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रिमियरला बॉलिवूडची हजेरी

SCROLL FOR NEXT