Latur Case: Video of NCP worker Anmol Kavathe before fatal stabbing. saam tv
क्राईम

Latur Crime: लातूर हत्याप्रकरण; राष्ट्रवादी पदाधिकारी अनमोल कवठे, सोनाली भोसलेच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ आला समोर

Anmol Kavathe Killing Case Video: सोलापूरमधील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अनमोल कवठेच्या लातूरमध्ये खून झाला. त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता.भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यातील त्यांचा अखेरचा व्हिडिओ समोर आलाय.

Bharat Jadhav

लातूरमध्ये अनमोल कवठे आणि सोनाली भोसलेवर चाकू हल्ला झाला.

हल्ल्यात अनमोल कवठेचा मृत्यू झाला तर सोनाली भोसले गंभीर जखमी झाल्या.

हल्ल्यापूर्वीचा कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

दोन दिवसांपूर्वी लातूर शहरातील ५ नंबर चौकाकडून जाणाऱ्या बायपासवर एक तरुण आणि तरुणीवर चाकू हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. अनमोल कवठे याचा मृत्यू झाला तर सोनाली भोसले गंभीर जखमी झाल्या. हा हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडिओ आता समोर आलाय.

हा व्हिडिओ एका कार्यक्रमातील आहे. लातूर शहरात भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यात अनमोल कवठे आणि सोनाली भोसले हे आले होते. त्या कार्यक्रमात डान्स करताना दिसत होते. त्या कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर त्यांच्यावर चाकू हल्ला झाला. गाडीला कट का मारला या कारणावरून सोलापूर येथील अनमोल कवठे आणि सोनाली भोसलेवर धारदार चाकूने हल्ला केला. यात अनमोल कवठे यांचा मृत्यू झाला.

लातूर शहरात भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यासाठी सोलापूरहून अनमोल कवठे आणि सोनाली भोसले आले होते. मध्यरात्री पाच नंबर चौकाकडून औसाला जाणाऱ्या बायपास रोडवर त्यांच्यावर काही अज्ञातांनी चाकू हल्ला केला. गाडीला कट का मारला? या कारणावरून सोलापूर येथील अनमोल कवठे आणि सोबत असलेल्या सोनाली भोसले या दोघांवर धारदार चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात अनमोल कवठेचा मृत्यू झाला तर सोनाली भोसले ही गंभीर जखमी आहे. तिच्यावर सध्या लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या हल्ल्यातील मयत अनमोल कवठे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता होता. अनमोलवर देखील खंडणी सारखे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपार देखील करण्यात आलं होतं.

तर घटनेतील आरोपी शुभमला पोलिसांनी अटक केली. आरोपीने अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर चाकूने सपासप वार केले. चाकू गळ्यामध्ये आरपार गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अनमोलची मैत्रीण सोनालीवर आरोपीने चाकूने छातीवर तीन आणि पाठीवर दोन वार केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Travel Tips: दिवाळीत ट्रेनमधून प्रवास करताय? या वस्तू चुकूनही घेऊन जाऊ नका

Gujarat News : गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड; 10-11 मंत्र्यांचा राजीनामा, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीला मिळणार महत्वाची जबाबदारी

Maharashtra Live News Update: अलिबाग येथील RCF कंपनी विरोधातील शिवसेनेने सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

Nashik Crime: गुन्हेगारी रॅपरची जिरवली; टक्कल करत काढली धिंड, कोयत्याची भाषा करणाऱ्याला चालताही येईना

Farmer Rasta Roko : चोपडा तालुका मदतीपासून वगळला; बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रस्ता रोको

SCROLL FOR NEXT