Nashik Crime  Saam Tv
क्राईम

Nashik Crime : कोयता नाचवत १० घरांच्या काचा फोडल्या, तोडफोडीचा थरार CCTVत कैद; नाशिकमध्ये दहशतीचं वातावरण

Koyta Gang Terror in Nashik Satpur : नाशिकमध्ये गावगुंडांची दहशत पाहायला मिळतेय. गावगुंडांनी घरांची तोडफोड केल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

नाशिकच्या सातपूरमध्ये गाव गुंडाची दहशत पाहायला मिळतेय. सद्गुरू नगरमध्ये १२ गावगुंडांनी कोयते नाचवत तोडफोड केल्याचं समोर आलंय. कोयते नाचवत केलेल्या तोडफोडीचा सिसीटिव्ही समोर आलाय. सद्गुरू नगरातील काठे अपार्टमेंटमधील इमारतीत तसेच परिसरातील दुकानांची तोडफोड केल्याची माहिती मिळतेय.

इमारतीमधील १० घरांच्या काचा फोडल्याचं समोर आलंय, एका युवकाला मारहाण करण्यासाठी गुंड आले होते. मात्र, युवक न मिळाल्याने परिसरात कोयते मिरवत तोडफोड करत त्यांनी दहशत माजविल्याची माहिती (Koyta Gang Terror in Nashik) मिळतेय. परिसरातील रहिवाशांना कोयता दाखवत या गावगुंडांनी शिवीगाळ देखील केलीय. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे.

नाशिकमध्ये गावगुंडांची दहशत

व्हिडिओमध्ये दिसतंय की, काही तरूणांनी तोंडाला मास्क बांधलेले (Nashik News) आहेत. ते हातात कोयते घेवून एका बिल्डिंगमध्ये घुसत आहे. काही घराच्या काचा तुटल्याचं देखील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. नाशिक शहरात या गावगुंडांनी धुमाकूळ घातलेला आहे. त्यांनी १० घरांच्या काचा फोडल्या असल्याची माहिती मिळतेय. हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. नाशिक मागील काही महिन्यांपासून अनेक लहान-मोठे गुन्हे घडत आहेत. घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांनी आता गावगुंडाचा तात्काळ बंदोबस्त (Crime News) करावा, अशी भूमिका घेतलेली आहे.

तोडफोडीचा थरार CCTVत कैद

नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंग सक्रिय झाली असल्याचं दिसतंय. या गँगकडून नागरिकांवर कोयत्याने हल्ले करण्याचे प्रमाण वाढलंय. कोयता गँगमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण (Nashik Crime News) आहे. दरम्यान आमदार सीमा हिरे यांनी संबंधित परिसरात भेट देत नागरिकांना धीर दिलाय. सातपूरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे केलीय. परिसरातील नागरिक घबराटीखाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT