Crime News  Yandex
क्राईम

Shocking News : लेस्बियन मैत्रिणीच्या मदतीने आईने केली मुलाची निर्घृण हत्या, कारण वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

Mother Kills Son: बंगालमध्ये एका आईनेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर तिने जे काही केलंय, त्याने पोलिसही चक्रावले आहेत. आईनेच लेस्बियन मैत्रिणीच्या मदतीने मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Rohini Gudaghe

Kolkata Crime Mother Kills Son

पश्चिम बंगालमधील हुगळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 8 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मृत मुलाच्या शरीराची विटंबना करण्यात आली होती. त्याच मनगट कापलं (Mother Kills Son) होतं. त्याच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा होत्या. त्याची आई आपल्या मुलाचा मृतदेह हातात धरून रडत होती. मुलाची शांतता आणि आईच्या दयनीय किंकाळ्या सर्वांनाच रडायला भाग पाडत होत्या.  (Latest Crime News)

एका निष्पाप बालकाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या व्यक्तीबद्दल सर्वजण संताप व्यक्त करत होते. आईचे सांत्वन करण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकांची गर्दी झाली होती. या घटनेच्या चार दिवसांनी मात्र मोठा खुलासा (Shocking Incident) झाला. त्यामुळे मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. धायमोकलून रडणाऱ्या आईनेच मुलाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने स्वत: चार दिवस रडण्याचं आणि दुःखी असल्याचं नाटक केल्याचं समोर आलं आहे. ही माता कुमाता का बनली, याचं कारण हैराण करणारं आहे. या महिलेचे तिच्या मैत्रिणीसोबत अनैतिक संबंध (Mother Kills Son With Help Of friend) होते. यातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. हे प्रकरण हुगळी जिल्ह्यातील कोननगर भागातील आहे. जिथे गेल्या शुक्रवारी पोलिसांना 8 वर्षीय स्नेहंगशु शर्माचा मृतदेह सापडला होता.

चार दिवसांनंतर पोलिसांनी मुलाची आई शांता शर्मा आणि तिची लेस्बियन पार्टनर इशरत परवीन यांना अटक केली आहे. या दोघींनीही त्यांचे प्रेमसंबंध स्वीकारले (Crime News) आहेत. त्यांनी पोलीस चौकशीत सांगितलं की, मुलाने या दोघींनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. मुलगा त्यांचं लेस्बियन असण्याचं रहस्य उघड करेल, अशी त्यांना भिती होती. या भितीपोटी त्यांनी मुलाची हत्या केल्याचं कबूल केलं आहे.

'अशी' केली मुलाची हत्या

या मुलावर अगोदर त्यांनी चाकूहल्ला केला. नंतर त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. त्यानंतर दगडाने त्याचा चेहरा ठेचला. त्यानंतर त्याचे हात कापले, अतिशय निर्दयीपणे त्यांनी या चिमुकल्याची हत्या केली आहे.

आरोपी शांताच्या पतीला इशरत आणि शांता यांच्यातील संबंधांची माहिती होती, असं सांगितले जात आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, शांता रात्री इशरतशी गुपचूप बोलायची. या दोघींचं बोलणं त्याला संशयास्पद वाटू लागलं (Kolkata Crime news) होतं. एकदा त्याने यांना एकत्र पाहिलं, त्यानंतर त्याला खात्री झाली होती. मात्र, त्यानं कुणालाही हे कळू दिलं नाही, शांतालाही हे लक्षात आलं नव्हतं. त्याला मुलाच्या भविष्याची काळजी होती. याशिवाय शांताची समाजात आणि नातेवाइकांमध्ये बदनामी होऊ नये, म्हणून त्याने ही गोष्ट गुपित ठेवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanitizer Disadvantage : प्रवासात सॅनिटायझर वारंवार हाताला लावताय? वेळीच व्हा सावध! अन्यथा

वही आणायला १० रुपये मागितले तर पप्पा...; शेतकऱ्याच्या लेकीची व्यथा, रोहित पवारही भावूक, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

पाकिस्तान तोंडघशी! पहलगामचे फोटो TRF ने पोस्ट केले, दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारली, UNSC च्या रिपोर्टमध्ये दावा

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

SCROLL FOR NEXT