Kolhapur Crime Saam Tv
क्राईम

Kolhapur: रात्री भररस्त्यात गाठलं, तिघांनी तरुणावर सपासप वार करत संपवलं; कोल्हापूर हादरले

Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. भरचौकात या तरुणाला गाठून त्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कोल्हापूर हादरले आहे.

Priya More

कोल्हापुरमध्ये धारधार शस्त्राने वार करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मारहाणीचा बदला म्हणून तिघांनी या तरुणाची हत्या केली. कोल्हापुरच्या कुरुंदवाड शहरामध्ये ही घटना घडली. अक्षय दीपक चव्हाण (वय २३ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे कुरुंदवाड शहरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या अक्षय दीपक चव्हाण आणि संशयित आरोपी यश काळे यांच्यात दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून हाणामारी झाली होती. अक्षयने यशला मारहाण केली होती. तोच राग मनात ठेवून यशने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने रविवारी रात्री उशिरा मजरेवाडी मार्गावरील सिद्धार्थ चौकात अक्षयवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे अक्षयचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अक्षयच्या हत्येचे वृत्त कळताच कुरुंदवाड परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी लोकांनी मोठ्यासंख्येने गर्दी केली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी यश सुनील काळे (वय १९ वर्षे, कुरुंदवाड), अमन जमीर दानवाडे (२२ वर्षे रा. इचलकरंजी), श्रीजय (२२ वर्षे रा. औरवाड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी शिरोली एमआयडीसी परिसरात सापळा रचत अवघ्या ५ तासांत हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पण पोलिसांनी पाठलाग करत त्यांना अटक केली. आरोपींनी चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली. अक्षयसोबत झालेल्या जुन्या वादातूनच त्यांनी हत्येचा कट रचत त्याला संपवलं, असं आरोपी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT