Kolhapur Crime Saam Tv
क्राईम

Kolhapur Crime: कोल्हापुरातील दरोड्याच्या घटनेत ट्विस्ट, नवऱ्यानंच घेतला बायकोचा जीव; धक्कादायक कारण समोर

Kolhapur Police: कोल्हापूरमध्ये नवऱ्याने दरोड्याचा बनाव रचून बायकोची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिस तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेमुळे कोल्हापूरात खळबळ उडाली आहे.

Priya More

कोल्हापूरच्या मडिलगे येथे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा पती गंभीर जखमी झाला होता. दरोडेखोर गुरव यांच्या घरातील तब्बल १४ तोळे सोनं आणि ९० हजार रुपये घेऊन पळून गेले होते. या दरोड्याच्या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दरोड्याच्या घटनेमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. नवऱ्यानेच आपल्या बायकोचा जीव घेतला. अवघ्या काही तासांमध्ये नवऱ्याने रचलेल्या कटाचं बिंग फुटलं. हे सत्य समोर येताच सर्वांना हादरला बसला. कर्जबाजारी नवऱ्याने सोन्यासाठी बायकोची निर्घृण हत्या केली.

कर्जबाजारी झाल्यामुळे नवऱ्याने बायकोचे दागिने गहाण ठेवून कर्ज पेडण्याचा विचार केला होता. त्याने बायकोकडे दागिने मागितले खरे पण तिने आपले दागिने देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने रागाच्या भरात बायकोची हत्या केली. दरोडा पडल्याचा बनाव रचून त्याने पोलिसांसोबत सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला खरा पण तो फसला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील मडिलगे गावात रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास ४ जणांनी सुशांत गुरवच्या घरावर दरोडा टाकल्याची बातमी समोर आली होती. घरातील सर्वजण साखरझोपेत असताना हा दरोडा पडला. सुशांतच्या घरामध्ये शिरून दरोडेखोरांनी दरोडा टाकताना त्यांच्या बायकोची हत्या केली. यावेळी सुशांतने दरोडेखोरांचा प्रतिकार केला पण त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. दरोडेखोरांनी सुशांतच्या घरातील १४ तोळे सोनं आणि ९० हजार रूपये लंपास केले होते.

या दरोडा प्रकरणी आजरा पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना अवघ्या २४ तासांत दरोड्याच्या घटनेमागचं सत्य समोर आलं. या प्रकरणात महिलेचा नवरा आरोपी असल्याचे आढळून आलं. पोलिसांनी सुशांतला हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानेच आपल्या बायकोच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करत तिची हत्या केली होती. बँकेचे कर्ज, लोकांकडून घेतलेले पैसे फेडण्यासाठी सुशांतने तिच्याकडे दागिने मागितले पण तिने नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात त्याने बायकोच्या डोक्यात फावडा घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुशांतच्या बायकोचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये 300 स्टेडियम उभारायचे आहे - नितीन गडकरी

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

SCROLL FOR NEXT