Kolhapur Crime News Saam Digital
क्राईम

Kolhapur Crime News: धक्कादायक! जिममध्ये घातक औषधांची विक्री; दोघांना अटक

Gangappa Pujari

रणजीत माजगावकर, कोल्हापूर|ता. २३ फेब्रुवारी २०२४

Kolhapur Crime News:

कोल्हापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शरीराला घातक असणाऱ्या औषधांची जिममध्ये विक्री करणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेली आहे. या कारवाईमध्ये दोघांकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापुरातील (Kolhapur) कळंबा इथं व्यायामशाळेत आणि एक दुकानात डॉक्टरांचे प्रेस्क्रीप्शन न देता बेकायदेशीर औषधांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी शरीरासाठी प्रोटीन्स सोबत घातक असणाऱ्या मेफ्टरमाईंन सल्फेट आणि इंजेक्शन विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

रक्तदाब कमी होण्यासाठी याचा वापर केला जातो. विशेष करून शस्त्रक्रियेवेळी डॉक्टर अशी औषध वापरतात. त्याची विक्री डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तसेच प्रिस्क्रिप्शनशिवाय करता येत नाही. तरीही त्याची शरीर सुदृढतेच्या नावाखाली दुकानात आणि व्यायामशाळेत विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी छापा टाकून व्यायामशाळा आणि दुकानाचा मालक प्रशांत मोरे, आणि कामगार ओमकार भोई या दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून 64 बाटल्या इंजेक्शन सह सिरींज आणि इतर साहित्य असा एकूण 40 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. (Latest Marathi News)

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT