Kolhapur Crime News Saam Tv
क्राईम

Kolhapur Crime News : नात्याला काळीमा! पैशांसाठी नातवाने केलं भयकंर कृत्य, आजीची हत्या करुन दागिने पळवले

Crime News Kolhapur : पैसे देण्यास नकार दिल्याने एका नातवाने त्याच्या आजीचा खून केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

रणजित माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Crime News : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पैसे देत नसल्याच्या रागातून नातवाने त्याच्या आजीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नातवासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. ही घटना कोल्हापूरच्या कागल तालुक्यात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सगुणा तुकाराम जाधव (वय ८०) असे आहे. तर महिलेच्या नातवाचे नाव गणेश चौगले आहे. आरोपी गणेश चौगलेवर कर्ज होते आणि हे कर्ज फेडण्यासाठी त्याला पैसे हवे होते. कर्जाचे पैसे फेडण्यासाठी त्याने आजीकडे उसने पैसे देण्याची मागणी केली. पण आरोपीच्या आजीने पैसे देण्यास नकार दिला.

पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीला राग आला आणि त्याने रागाच्या भरात आजीला मारण्याचा कट रचला. त्याने साथीदारांसह आजीची हत्या केली आणि तिच्या अंगावरचे दागिने घेऊन तो पळून गेला. ही घटना कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथे मंगळवारी (११ फेब्रुवारी) रात्री उशिरा घडली.

या हत्या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांनी अवघ्या एका तासात नातवासह त्याच्या दोन्ही साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या साथीदारामधील एकजण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

कोल्हापुरातल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करून चाकूचा धाक

याच दरम्यान कोल्हापूरात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. सांगली फाटा येथील कोरगावकर पेट्रोल पंप येथे दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तीने कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवला. संबंधित व्यक्तीने पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याचा फोन देखील फोडला. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Saree Contrast Blouses: साध्या कॉटन साडीला स्टायलिश लूक देणार 5 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाईन

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद उफळला

SCROLL FOR NEXT