Police investigate tragic father-son murder case in Kolhapur’s Vikramnagar area. saam tv
क्राईम

Kolhapur Crime News: पोटच्या पोराला बापानेच संपवलं, तपासात समोर आलं हत्येचं धक्कदायक कारण

Father Killed Son: कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात का व्यक्तीने संतापाच्या भरात आपल्या मुलावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. आरोपी वडिलांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Bharat Jadhav

  • कोल्हापुरात बापाने मुलाची हत्या

  • दारूच्या व्यसनामुळे सतत वाद

  • संतापाच्या भरात चाकूने वार

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

दारूच्या नशेत सतत घरच्यांना त्रास देणाऱ्या मुलाला खुद्द बापानेच संपवल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे.संतापाच्या भरात बापानेच मुलाची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात घडली. सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस तपासात हा प्रकार समोर आला आहे. आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.

विक्रमनगरमधील स्वामी समर्थ कॉलनी येथे गफूर सुलतान पठाण हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा जुनेद गफूर पठाण (वय 20) हा दारूच्या आहारी गेला होता. तो रोज मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन कुटुंबीयांशी वाद घालत असायचा. या सततच्या त्रासाला कंटाळून सोमवारी रात्री झालेल्या वादातून संतापाच्या भरात वडील गफूर यांनी घरात असलेल्या चाकूने जुनेदच्या छातीत वार केला. गंभीर जखमी झालेल्या जुनेदला वडिलांनीच रिक्षातून CPR रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला मुलगा मिरवणुकीत जखमी झाल्याची खोटी माहिती देत गफूर यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली असता गफूर पठाण यांनी गुन्ह्याची कबुली दिली. राजारामपुरी पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

सोलापुरात ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या

सोलापूरमध्ये ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. शहरातील लष्कर परिसरातील बालप्पा तालीम परिसरात राहणाऱ्या गरोदर महिलेची भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून हत्या करण्यात आली. सोनी गणेश रामपुरे असं या महिलेचे नाव होते. बापू सुरेश आरगोळ या तरुणाने सोनीची निर्घृण हत्या केली. या घटनेत महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा

Ambenali Ghat: सह्याद्रीच्या कुशीतील अप्रतिम सौंदर्य! महाबळेश्वरला जाताना 'या' घाटाची सफर नक्की करा

Pune: बॉयफ्रेंडने केला मानसिक छळ 23 वर्षीय गर्लफ्रेंडची नदीत उडी मारून आत्महत्या; IT क्षेत्रात खळबळ

ITR Filling 2026 : तुमच्या कामाची बातमी! ३१ जुलैपर्यंतचं आयटीआर फाइल करता येणार? की मुदत वाढणार? वाचा सविस्तर

Fort In Dhule : धुळे जिल्ह्याची ऐतिहासिक शान! त्रिकोणी रचनेमुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT