Kolhapur News Saam Tv
क्राईम

Kolhapur Crime News : दूध आणायला गेलेल्या बहीण भावाचं अपहरण, रणरागिणीने अपहरणकर्त्यांचा डाव उधळला

Kolhapur News : कोल्हापूरच्या नांदणी गावात आठ वर्षांच्या स्वराने धाडस दाखवत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. तिने चावा घेऊन आणि आरडाओरड करून भावाचा जीव वाचवला. पोलिस तपास सुरू असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Alisha Khedekar

  • कोल्हापूरच्या नांदणीत आठ वर्षांच्या मुलीवर अपहरणाचा प्रयत्न

  • स्वराने अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेऊन बचाव केला

  • गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला; पोलिस तपासात सीसीटीव्हीचा आधार

  • समाजमाध्यमांवर स्वराच्या धैर्याचे कौतुक आणि पालकांत भीतीचे वातावरण

कोल्हापूरच्या एका छोट्या रणरागिणीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वरा देसाई या ८ वर्षीय चिमुकलीने अपहरणकर्त्यांपासून सुटका करत स्वतःचा जीव वाचवला आहे. तिने दाखवलेले धैर्य कौतुकास्पद ठरत आहे. मात्र अपहरणाच्या घटनेने पालक वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा संध्याकाळच्या सुमारास आपल्या लहान भावासह दूध आणण्यासाठी बाहेर पडली होती. गावातील रस्त्याने जात असताना अचानक मागून पाच अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी स्वराचे आणि तिच्या भावाचे तोंड दाबून उचलून नेण्याचा प्रयत्न सुरू केला. घाबरून जाण्याऐवजी स्वराने धाडस दाखवत अपहरणकर्त्याच्या हाताला जोरात चावा घेतला आणि मोठ्याने आरडाओरडा केला. या अनपेक्षित प्रतिकारामुळे घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी दोन्ही मुलांना सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

मुलांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले. त्यांना घडलेली घटना कळताच गावकरी संतापले. त्यांनी त्या अनोळखी व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधारात ते फरार झाले. या घटनेमुळे गावात मुलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वराने आपल्या धैर्याने भावाचे प्राण वाचवले, यामुळे तिचे कौतुक सर्वत्र होत आहे. एका आठ वर्षांच्या मुलीने दाखवलेले हे साहस खरोखरच प्रेरणादायी ठरले आहे.

संबंधित गुन्ह्याची नोंद शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. समाजमाध्यमांवरही या प्रकरणाबाबत संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism: सोलनपासून हाकेच्या अतंरावर आहे स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, ठिकाण पाहून मंत्रमुग्ध व्हाल

Navratri Festival: 'माय म्हणी अंबा माय! नवरात्रीत सप्तश्रृंगी गडावर धावणार जादा बसेस; कुठून अन् किती असतील बसेस?

गोंदियात ओबीसींचा एल्गार मोर्चा, मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी | VIDEO

Maharashtra Live News Update: मागील ११ वर्षात देशात २५ कोटी लोकांनी गरिबीला हरवलं आहे - PM मोदी

Narendra Modi : प्रत्येक भारतीयाचे वर्षाला अडीच लाख वाचले; PM मोदींनी दिला स्वदेशीचा नारा

SCROLL FOR NEXT