Kolhapur Crime News  Saam Digital
क्राईम

Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दादागिरी! हात पाय बांधून तरुणांना बेदम मारहाण; ७ जणांवर गुन्हा दाखल

Kolhapur Latest News: मोक्यातून सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखे आणि त्याच्या काही सहकाऱ्यांकडून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर| कोल्हापूर, ता. २८ जून २०२४

कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी चार मुलांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोक्यातून सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखे आणि त्याच्या काही सहकाऱ्यांकडून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हत्या, मारामारीचे सत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एक महिला आणि काही तरुणांना अज्ञातस्थळी नेत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच इचलकरंजीमध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांकडून चार तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हात पाय बांधून एका बंद खोलीत या मुलांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे व्हिडिओ सध्या समोर आले आहेत. मोक्याच्या गुन्ह्यातून सुटलेला गुन्हेगार श्याम लाखे आणि त्याच्या साथीदारांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. तरुणाचे पाय बांधून चौघांच्या मदतीने श्याम लाखे हा लोखंडी पाईपने मारहाण करताना दिसत आहे.

धक्कादायक म्हणजे आपली दहशत कायम राहावी यासाठी व्हिडिओ व्हायरल केल्याचेही तपासात समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अमरावती ठरले देशातील सर्वाधिक उष्ण शहर; 41.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

Gas Cylinder Clash : गॅस सिलेंडरवरुन हाणामारी आणि राडा, एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत गेला वाद

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या निधीत कपात; ९५०० कोटी कापले; नेत्यानं थेट आकडेवारीच दिली

घरगुती गॅसचा साठा, व्यावसायिकांवर छापा; सामच्या ऑपरेशन सिलेंडरनंतर प्रशासनाला जाग

PM Kisan Yojana : महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकर्‍यांना गुड न्यूज, तब्बल ₹१,८३७ कोटी जमा; तुमच्या खात्यात पैसे आले का?

SCROLL FOR NEXT