Chhatrapati Sambhajinagar: गाडी न थांबवल्याचा राग, वाहतूक पोलिसांकडून तरुणाला भरचौकात बेदम मारहाण; पाहा VIDEO

Chhatrapati Sambhajinagar Crime News: इशारा करुनही गाडी न थांबवल्याने आणि धक्का मारुन गाडी घेऊन गेल्याच्या रागातून तीन वाहतूक पोलिसांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime NewsSaamtv

छत्रपती संभाजीनगर, ता. २७ जून २०२४

इशारा करुनही गाडी न थांबवल्याने आणि धक्का मारुन गाडी घेऊन गेल्याच्या रागातून तीन वाहतूक पोलिसांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूजमध्ये एका चौकात ही घटना घडली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, चौकामध्ये इशारा करुनही वाहन न थांबवल्याने आणि धक्का मारून गाडी घेऊन गेला म्हणून एका ड्रायव्हर तरुणाला तिघा पोलिसांनी बेदम मारहाण केली. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यावरून पोलिसांवर संताप व्यक्त केला जात आहे.

वाळूज औद्योगिक परिसरातील एनआरबी चौकामध्ये २६ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजेदरम्यान एक टाटा एस गाडी चालक न थांबता पोलिसांना धक्का पुढे गेला असे सांगितले जात आहे. त्यावरूनच तीन पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime News
Pune Zika Virus News: पुणेकरांची चिंता वाढली; हडपसरमध्ये आणखी एक झिका रुग्ण!

जर ड्रायव्हर तरुणाची चूक असेल तर पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेलं पाहिजे होतं. मात्र तीन पोलिसांनी भररस्त्यात अमानुषपणे त्यांना मारहाण केली. शिवाय याची तक्रार ही वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेतली नाही याऊलट त्या तरुणाची गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षकांनीही कोणतीच प्रतिक्रिया न दिल्यानेसंताप व्यक्त केला जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime News
Sanjay Raut News : 'मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक नाही', ठाकरेंचं नाव घेत संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान!, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com