khardi police arrests three at mumbai agra national highway  saam tv
क्राईम

Shahapur Crime News: रात्र गस्त घालताना खर्डी पाेलिसांकडून खूनाचा कट उघडकीस, तिघांना अटक

या तिघांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Shahapur Crime News :

विधवा बहिणीला प्रॉपर्टीच्या वादातून त्रास देणाऱ्याची हत्या करण्यासाठी आलेल्यांना खर्डी पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील कुकांबे रोडवर अटक केली. पाेलिसांनी संशयितांकडून एक मोटरसायकल, एक माल वाहतुक वाहन व हत्यारे जप्त केली आहेत. या कारवाईची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी साम टीव्हीला दिली.  (Maharashtra News)

खर्डीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असतांना कुकांबे फाट्यावर उभ्या असलेल्या एका वाहनाजवळ तीन जण संशयितरित्या फिरताना आढळले. त्यांची पोलिसांनी विचारपूस केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे पोलिसांना त्यांचा संशय आला. पाेलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात गावठी बॉम्ब, जिलेटीन कांड्या व चाकू-सुरा असे मिळून आले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत खर्डी पोलीस दुरक्षेत्रात आणून त्यांची सखाेल चाैकशी केली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पंकेश शिंदे याच्या विधवा बहिणीकडे दीर प्रभाकर सासे हा शरीरसुखाची मागणी करून त्रास देत असे. प्रॉपर्टीच्या हिस्से वाटणीत दुजाभाव करीत असल्याने याचा राग मनात धरून पंकेश याने प्रभाकर सासे यांची हत्या करण्याचा कट रचला.

खर्डी पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार, पोलीस फौंजदार भगवान निचिते, पोलीस नाईक एन.एम.मांडोळे यांनी गस्त घालत असताना हत्येचा कट उघडकीस आणला.

2 लाख 27 हजाराचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी पंकेश शिंदे (वय 33, रा.भिवंडी), महेश चव्हाण (वय 40, रा. मुंबई) व राजन हरड (वय 30, रा.पडघा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडू टेम्पो, मोटरसायकल, 3 मोबाईल व हत्यारे असा 2 लाख 27 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिघांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

SCROLL FOR NEXT