Kerala News 
क्राईम

Crime : २३ वर्षाच्या पोराचं डोकं फिरलं! आई-बाप,गर्लफ्रेंड,काका-काकी, भावाला संपवलं; कारण काय तर...

Kerala News : २३ वर्षीय कर्जबाजारी तरूणाने सहा जणांची हत्या केली, त्यानंतर स्वत: विष घेतलं. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Thiruvananthapuram Murder Case : एका २३ वर्षीय मुलाने गर्लफ्रेंड आणि अख्ख्या कुटुंबालाच संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्जबाजारी २३ वर्षीय मुलाने आई-बाप, गर्लफ्रेंड, काक-काकी, भाऊ आणि आजी यांना संपवले. त्यानंतर स्वत: विष प्यायला. त्याला रूग्णालयात दाखल कऱण्यात आले असून उपचार सुरू आहेत. २३ वर्षीय मुलाची आईही थोडक्यात बचावली आहे, तिच्यावरही जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

२३ वर्षीय आरोपीने सोमवारी (२४ फेब्रुवारी) रात्री काही तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी हत्या केल्या. त्यानंतर आरोपी स्वत: पोलिसांत गेला अन् गुन्हा कबूल केला, त्यावेळी पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली. पोलिसांनी सहा जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मृतामध्ये १३ वर्षीय भाऊ असहान, आजी सलमा, काका लतीफ, काकी शाहिहा आणि गर्लफ्रेंड फरशाना यांचा समावेश आहे.

आरोपीवर रूग्णालयात उपचार, आईची प्रकृतीही चिंताजनक

२३ वर्षीय आरोपी अफान याची आईची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर तिरूवनंतपूरम येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांसमोर सरेंडर करताना अफान याने विष प्यायल्याचे सांगितले, त्यानंतर त्यालाही पोलिसांनी रूग्णालयात दाखल केले. अफान आणि त्याच्या आईची प्रकृती सध्या नाजूक असल्याचे सांगण्यत येत आहे.

६ जणांच्या हत्याकांडाचा तपासाला वेग -

सामूहिक हत्याकांडाची पोलिसांना अद्याप खरे कारण समजले नाही.प्राथमिक माहितीनुसार, कर्जबाजारी झाल्यामुळे तरूणाने हत्याकांड केले.पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास वेगाने सुरू केला असून सर्व बाजूने चौकशी केली जात आहे. सहा जणांच्या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT