Karnataka Crime  Saam Tv
क्राईम

महिला हत्या प्रकरणात भयंकर ट्विस्ट; बॉयफ्रेंडचा क्रूर चेहरा उघड, अनैतिक संबंध, लॉजवर हादरवून टाकणारा शेवट

Karnataka Crime: कर्नाटकामध्ये भयंकर घटना घडली. एका तरुणाने आपल्या २० वर्षीय गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केली. लॉजवर नेऊन त्याने गर्लफ्रेंडच्या तोंडात स्फोटकं भरून टिगरने ते उडवून दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

कर्नाटकामध्ये एका लॉजवर महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या महिलेची हत्या तिच्याच बॉयफ्रेंडने केली असल्याचे उघड झाले आहे. आरोपीने सुरूवातीला सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मोबाईलचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले होते. पण पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यामध्ये ही भयंकर घटना घडली होती. २० वर्षीय महिलेचा लॉजमध्ये मृतदेह आढलून आला होता. आरोपीने गर्लफ्रेंडच्या तोंडात स्फोटकं भरली आणि तिला ट्रिगरने उडवून दिले होते. या प्रेम प्रकरणाचा लॉजवर भयंकर शेवट झाला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सध्या कर्नाटकात या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय महिलेची तिच्या बॉयफ्रेंडने निर्घृण हत्या केली. त्याने तरुणीच्या तोंडात स्फोटके भरली आणि खाणींमध्ये जिलेटिनच्या काड्या फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रिगरने तिला उडवून दिले. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. मृत महिलेचे नाव रक्षिता होते. ती हंसुर तालुक्यातील गेरासनहल्ली गावात राहणारी होती.

ती बॉयफ्रेंड सिद्धराजूसोबत भेर्या गावातील एका लॉजवर थांबली होती. रक्षिताचे लग्न केरळच्या एका मजूरासोबत झाले होते. पण रक्षिताचे सिद्धराजूसोबत अनैतिक संबंध होते. सिद्धराजू तिच्याच नात्यातील आहे. लॉजवर असताना दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात रागाच्या भरात सिद्धराजूने रक्षिताच्या तोंडामध्ये स्फोटक पदार्थ ठेवले आणि टिगरने ते उडवून दिले.

या घटनेनंतर सिद्धराजने सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने दावा केला की, रक्षिताचा मृत्यू मोबाईल फोनच्या स्फोटामुळे झाला. पण अखेर सत्य उघड झाले. सिद्धराज पळून जाण्याच्या प्रयत्नात होता तेवढ्यात नागरिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर रक्षिताचा मृतदेह बेडवर आढळून आला. तिच्या चेहऱ्याचा खालचा भाग पूर्णत: फाटला होता. सर्वत्र रक्त पडले होते. रक्षिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: जिमला न जाता रोज 10 मिनिटांत स्वत:ला देऊन करा फॅट बर्न; वापरा मायक्रो वर्कआउट ट्रिक

Red Banana Vs Yellow Banana: लाल की पिवळी; कोणती केळी आरोग्यासाठी फायदेशीर?

MSRTC Big Decision: एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; ३० रुपयांत चहा-नाश्ता अन्..., वाचा नेमके काय घेतला निर्णय?

Maharashtra News Live Update: मावोवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सी६० जवानांचा होणार विशेष सन्मान

High Blood Pressure: सायलेंट किलर 'हाय BP'चा हृदयावर परिणाम, वेळीच सावध होण्यासाठी डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT