Manasvi Choudhary
लाल केळी पिवळ्या केळीपेक्षा आरोग्यासाठी फायदेशीर असतात. लाल केळी ही ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, अमेरिका या देशात पिकतात. भारतात काहीच ठिकाणी याची लागवड केली जाते.
लाल केळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँथोसायनिनसारखे शक्तिशाली घटक असतात जे शरीरातील पेशीचे कार्य सुरळीत ठेवते.
लाल केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियन भरपूर असते यामुळे शरीराचे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पचनक्रिया , बद्धकोष्ठता या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून तुम्ही लाल केळी खाऊ शकता.
लाल केळीमधील व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.
लाल केळी डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. लाल केळी खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.