Manasvi Choudhary
लांब आणि चमकदार केस असावेत अशी प्रत्येक महिला व मुलींची इच्छा असते मात्र सध्या केस गळतीच्या समस्येने महिला त्रस्त आहेत.
केस गळण्याची अनेक कारणे आहेत. केस गळणे, टक्कल पडणे यामुळे केवळ शारीरिक परिणाम नाहीतर मानसिक परिणामही होतो.
केस गळतीच्या समस्येमुळे अनेक जण बाहेर जाणे, लोकांमध्ये मिसळणे आणि अगदी आरशामध्ये स्वत:ला पाहणे देखील सोडतात.
मानसशास्त्रज्ञाच्या मते, केस गळण्याने व्यक्तीच्या मानसिकतेवरही परिणाम होतो आहे.
केस हे स्त्रियांच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. मात्र केस गळणे, केस तुटणे, टक्कल पडणे यामुळे सौंदर्य बिघडते.
केस गळण्यामुळे महिला अधिक विचार करतात. काहींच्या वैवाहिक जीवनावर देखील परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. केवळ स्त्रियांनाच नाही तर पुरूषांनाही टक्कल पडणे हे वृद्धत्वाशी जोडले गेले आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.