Kalyan crime news saam tv
क्राईम

कल्याणमधील संतापजनक घटना: पैशांच्या वादातून नराधम पतीने पत्नी आणि ५ वर्षांच्या चिमुकल्यावर फेकले उकळते मटण

Kalyan crime news father attacks child and wife with boiling food : पैशांच्या वादातून पतीने केलेल्या अमानुष कृत्याने कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसर हादरून गेला आहे.

Saam TV News

पैशांच्या वादातून पतीने स्वतःच्या पत्नीवर आणि पाच वर्षांच्या निष्पाप मुलावर उकळते मटण फेकून गंभीररीत्या भाजल्याची अत्यंत संतापजनक घटना कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात आरोपी पतीत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वालधुनी परिसरात राहणारा आरोपी अमिर खान याने आपली पत्नी गुलशन हिच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, गुलशनने पैसे देण्यास असमर्थता दर्शवत नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वादाच्या भरात संतापलेल्या अमिरने पत्नीला बेदम मारहाण करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने घरातील अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला सदऱ्याची गळपट्टी पकडून बाथरूमच्या दिशेने फरफटत नेले.

आपल्या चिमुकल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी गुलशन तत्काळ धावून गेली. मुलाला सोडवण्याच्या प्रयत्नात पती-पत्नीमध्ये जोरदार झटापट झाली. त्याच वेळी स्वयंपाकघरात गॅसवर मटण शिजत होते. क्रूरतेची हद्द ओलांडत अमिरने गॅसवरील उकळत्या मटणाचे पातेले उचलून थेट पत्नीच्या अंगावर फेकले. या उकळत्या मटणामुळे आणि गरम पाण्यामुळे गुलशनचे हात-पाय गंभीररीत्या भाजले. तसेच, जवळच उभा असलेला पाच वर्षांचा मुलगाही या गरम पाण्यामुळे भाजला गेला.

घटनेनंतर गंभीर भाजलेल्या अवस्थेत माय-लेकाला तातडीने केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर, गुलशनने हिंमत दाखवून थेट महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले आणि पती अमिर खानविरोधात तक्रार नोंदवली.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमिर खानविरोधात गुन्हा दाखल केला असून या घृणास्पद घटनेचा पुढील कायदेशीर तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कल्याण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीत १०, २० आणि ५० च्या नोटा मिळणार नाहीत, पैशांचा तुटवडा भासणार? RBI ने दिली महत्वाची अपडेट

Maharashtra News Live Update : शिवसेनेची सुनावणी आजही पुढे ढकलली

Gold Price Today : दिवाळीपूर्वी ग्राहकांसाठी गुड न्यूज! चांदी तब्बल २ हजारांनी स्वस्त, पाहा सोन्याचे दर

आमदारांच्या नाराजीनंतर आता राजीनामा सत्र सुरू; खासदाराचा तडकाफडकी राजीनामा, NC ला मोठा धक्का

Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा गंडा; डिजिटल अरेस्टची धमकी देत उकळले पैसे

SCROLL FOR NEXT