Kalyan Crime News Saam Tv
क्राईम

Kalyan News: एटीएम सेंटरमध्ये कार्डाची हेराफेरी करत नागरिकांची लूट, भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kalyan Crime News: एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवण त्यांच्याकडून पिन नंबर घेऊन, एटीएम कार्डची अदलाबदली करत रोकड काढणाऱ्या भामट्याला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kalyan Crime News:

>> अभिजित देशमुख

एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवण त्यांच्याकडून पिन नंबर घेऊन, एटीएम कार्डची अदलाबदली करत रोकड काढणाऱ्या भामट्याला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहे. दीपक झा, असं या भामट्याचं नाव आहे. त्याच्या विरोधात कल्याण डोंबिवली भिवंडी ठाणे नाशिक येथील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून 92 एटीएम कार्ड हस्तगत केलेत. दीपक झा याचा साथीदार पसार आहे. दीपकने आणखी अनेक नागरिकांचे अशाप्रकारे फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसापूर्वी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात दोन महिलांनी एका भामटाने त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करत पैसे काढल्याची तक्रार नोंदवली होती. त्या दोघी कल्याण मधील एका एटीएम सेंटरमध्ये गेल्या. त्यांनी सेंटरमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पैसे एटीएममधून निघाले नाही. त्यांच्या मदतीसाठी एक तरुण पुढे आला. त्यानेही प्रयत्न केला. पैसे निघाले नाही. थाेड्याच वेळात त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आली.

तक्रार आल्यानंतर डीपीसी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलैश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी तानाजी वाघ यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्या सीसीटीव्हीत दोन तरुण कैद झाले होते. खबरीने दिलेला माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचत दीपक झा याला अटक केली. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरु आहे.

दीपक झा याच्याकडून विविध कंपन्याचे ९२ एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दीपक झा याच्या गुन्ह्याची पद्धत होती. दीपक एटीएम बाहेर उभा राहायचा. स्टेशन परिसरात अनेक नागरिक एटीएम सेंटरमध्ये येतात. ज्यांना एटीएम ऑपरेट करता येत नाही. त्याची माहिती नसते. अशा नागरिकांना दीपक व त्याचा साथीदार हेरायचा. असे नागरीक जेव्हा एटीएममध्ये पैसे काढण्यास जात होते, तेव्हा त्यांना मदतीच्या नावाखाली दीपक झा आणि त्याचा साथीदार आत यायचे.

पीन कोड काय टाकला जात आहे. ते पाहून घ्यायचे. बोलण्यात गुंतवून हातचलाखी करुन एटीएम बदलून टाकायचे. दुसरा एटीएम कार्ड त्या नागरीकांच्या हाती द्यायचे. डुप्लीकेट एटीएमच्या सहाय्याने पैसे काढण्याचे नाटक करायचे. पैसे निघत नसल्याने नागरीक घरी जायचे. त्यानंतर दीपक झा आणि त्याचा साथीदार ओरीजनल एटीएमच्या सहाय्याने पैसे काढून घ्यायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आधी डॉक्टर झाली, पहिल्याच प्रयत्नात केली UPSC क्रॅक; बस कंडक्टरची लेक झाली IAS अधिकारी

Navpancham Rajyog: उद्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध-यम यांच्यामुळे नवपंचम राजयोग तयार होऊन मिळणार पैसा

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

SCROLL FOR NEXT