Kalyan News Saamtv
क्राईम

Kalyan Girl Murder Case : कल्याण हत्या प्रकरणात ट्विस्ट; आरोपी विशाल गवळीकडं मनोरुग्ण दाखला, पण एका गोष्टीमुळं सस्पेन्स वाढला

Kalyan minor murder updates : कल्याणमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या करणाऱ्या विशाल गवळी याच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Vishal Gawli mental illness certificate : कल्याणमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या करणाऱ्या विशाल गवळी याच्याबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बुधवारी पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आणि त्याला आज न्यायालयात हजर केले असता, २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विशाल गवळी याच्याबद्दल उघड झालेली धक्कादायक माहिती म्हणजे त्याच्याकडे मानसिक रुग्ण असल्याचा दाखला आहे, जो त्याने याआधी दोन वेळा जामीन मिळवण्यासाठी वापरला होता. या दाखल्याच्या वापरामुळे त्याने न्यायालयातून सुटका मिळवली होती. आता पोलिस तपास करत आहेत की हा दाखला कसा मिळवला गेला आणि यामागे कोण होते. याशिवाय, आणखी चार ते पाच आरोपींनीही अशाच प्रकारचा दाखला मिळवला असल्याचे उघड झाले आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि न्यायालयाने विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण शहरात लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नराधम विशाल गवळीकडे मानसिक रुग्ण असल्याचा दाखला असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या दाखल्याचा वापर करून त्याने दोनवेळा जामीन मिळवला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल गवळीकडे हा दाखला कोणी दिला आणि तो कसा मिळवला, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. याशिवाय, विशाल गवळीसह आणखी चार ते पाच आरोपींकडेही अशा प्रकारचा मानसिक रुग्णाचा दाखला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नराधम विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

कल्याणमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांना अटक करण्यात आली. आज आरोपी विशाल गवळी व त्याची पत्नी साक्षी गवळी यांना कल्याण न्यायालयात हजर केलं, न्यायालयाने 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून आरोपीकडून कोणत्या वस्तू वापरल्या, कुठे अत्याचार केला, त्याच्या विरोधात याआधी देखील काही गुन्हे दाखल आहेत, याबाबत अधिक तपास करायचा आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची मागणी केली.

न्यायालयाने नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी याना न्यायालयाने सुनावली 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश व्ही ए पत्रावळे दालनात सुनावणी झाली. या वेळी सरकारी वकीलांनी आणि पोलिसांनी आरोपीने मुलीचे अपहरण कुठून केले? तिची हत्या कशी आणि कशाप्रकारे तिला मारलं त्याला मदत करणारे अजून काही आरोपी आहेत का? त्याचबरोबर हत्या करण्यासाठी काय साहित्य वापरलं? या सगळ्या तपासणीसाठी पोलीस कोठडी मागितली असून न्यायालयाने अधिक तपासासाठी या दोघांना दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीवर सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

सकाळी सकाळी शरीरात दिसणारे 'हे' बदल सांगतात किडनी फेल होतेय

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

SCROLL FOR NEXT