Kalyan Crime Saam Tv
क्राईम

Crime: कल्याण हादरले! सासूकडून सुनेची हत्या, मित्राच्या मदतीने मृतदेह वालधुणी पुलाखाली फेकला

Kalyan Crime: कल्याणमध्ये संपत्तीचा वाद आणि नोकरीवरून एका महिलेने सूनची हत्या केली. मित्राच्या मदतीने सूनेच्या डोक्यात रॉड घालून हत्या करण्यात आली. मृतदेह वालधुणी पुलाजवळ फेकून देण्यात आला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Priya More

Summary -

  • कल्याणमध्ये सासूने सुनेची निर्घृण हत्या केली

  • लोखंडी रॉडने हल्ला करून केली हत्या

  • मृतदेह वालधुणी पुलाखाली फेकला

  • संपत्ती आणि रेल्वे नोकरीच्या वादातून हत्या केल्याचं तपासात उघड

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये सासूने सूनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. संपत्ती आणि रेल्वेमध्ये नोकरीसाठी सासूने हे भयंकर कृत्य केले. आरोपी महिलेने मित्राच्या मदतीने रॉडने डोक्यात वार करत सुनेची हत्या केली. त्यानंतर मृतदेह वालधुणी पुलाखाली फेकून दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास केला आणि अवघ्या २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शहरात ही घटना घडली. वालधुनी पुलाखाली रक्तबंबाळ अवस्थेत एक ३५ वर्षीय महिला आढळून आली होती. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णलयात नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच महिलेला मृत घोषीत केले. महिलेच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर जखमा होत्या. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे महिलाचा मृत्यू झाला असून या महिलेची हत्या झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत तपास सुरू केला. तपासादरम्यान लताबाई नाथा गांगुर्डे या महिलेने सून रूपाली विलास गांगुर्डे ही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. या महिलेने पोलिसांना दिलेला सूनेचा फोटो आणि मृतदेह सापडलेली महिला सारखीच दिसत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावरून हत्या झालेली महिला रुपाली गांगुर्डे असल्याचे तपासातून उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा कसून तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

रूपालीचा नवरा विलास गांगुर्डे हा रेल्वेत नोकरी करत होता. पण काही महिन्यांपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रूपालीला सुमारे ९ ते १० लाख रुपयांची ग्रॅच्युएटी मिळाली होती. हे पैसे सासू लताबाई मागत होत्या. मात्र रूपालीने पैसे देण्यास नकार दिला. तसेच अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी सासूचा आग्रह न मानता स्वतः अर्ज केल्याने वाद वाढला. या रागातून लताबाई गांगुर्डे आणि तिचा मित्र जगदीश म्हात्रे यांनी संगनमत करून १ जानेवारी रोजी रुपालीची हत्या केली.

दोन्ही आरोपी रूपालीच्या घरी गेले आणि त्यांनी तिची लोखंडी रॉडने हल्ला करत हत्या केली. हत्येनंतर मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकून दिला आणि संशय टाळण्यासाठी पोलिस ठाण्यात जाऊन सून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र महात्मा फुले पोलिसांनी तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या २४ तासांत हत्येचा उलगडा केला. सखोल चौकशीनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT