Kalyan Crime News Saam TV
क्राईम

Kalyan Crime News: रस्त्यात लोकांना बोलण्यात गुंतवायचा अन् दागिने चोरून पसार व्हायचा; कल्याण क्राईम ब्रांचने ठोकल्या बेड्या

Crime News: कल्याण क्राईम ब्रांच पोलीस कर्मचारी अनुप कामत व विनोद चन्ने यांना एक संशयित आरोपी चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी कल्याण पश्चिम सोनार गल्ली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

Ruchika Jadhav

कल्याण अभिजित देशमुख

Kalyan Crime News:

कल्याणमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. पायी चालणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्याजवळील दागिने लंपास करणाच्या घटना वाढतच चालल्या आहेत. अशाच एका भामट्याला कल्याण क्राईम ब्रांचने सापळा रचत बेड्या ठोकल्यात.

अफजल खान असं या सराईत चोरट्याचं नाव असून त्याच्या विरोधात महात्मा फुले, डोंबिवली,विष्णू नगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक तर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.

कल्याण डोंबिवलीत रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना थांबवून बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील सोन्या चांदीचे दागिने घेऊन पसार होण्याच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कल्याण क्राईम ब्रांच पथक या आरोपीचा शोध घेत होते. कल्याण क्राईम ब्रांच पोलीस कर्मचारी अनुप कामत व विनोद चन्ने यांना एक संशयित आरोपी चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी कल्याण पश्चिम सोनार गल्ली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार ,पोलीस निरीक्षक राहुल मस्के, संदीप चव्हाण यांच्या पथकाने सोनार गल्ली या ठिकाणी सापळा रचला. एक इसम संशयास्पदरित्या फिरताना त्यांना त्या ठिकाणी आढळून आला. या क्राईम ब्रांच पथकाने त्याच्यावर झडप टाकत त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.

पोलीसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. अफजल खान असं या सराईत चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी पावणे तीन लाखाचे दागिने हस्तगत केलेत. अफजल कल्याण डोंबिवली परिसरात पायी चालणाऱ्या नागरिकांना हेरायचा, त्यांना थांबून त्यांचा बोलण्यात गुंतवायचा त्यानंतर हातचलाखीने त्यांच्या अंगावरील दागिने चोरी करून तेथून पसार व्हायचा.

अशा प्रकारचे त्याने अनेक गुन्हे केले असल्याचे संशय पोलिसांना आहे त्याच्या विरोधात आत्तापर्यंत सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ- नांदेड 'या' दोन जिल्ह्याचा संपर्क तुटला, पैनगंगा नदीला पूर

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

GST Reforms: दूध, दही, टीव्ही, फ्रिज होणार स्वस्त? मोदी सरकार देणार गिफ्ट

६-७-८-९ नाही, १० थरांचा विश्वविक्रम; जय जवान पथकाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारं कोकण नगर गोविंदा पथक नेमकं कुठलं?

SCROLL FOR NEXT