Kalyan Politics: आधी राजकीय वार-पलटवार, मग थेट गोळीबार, आता सोशल वॉर; आमदार गणपत गायकवाडांच्या अटकेनंतर राजकारण तापलं

MLA Ganpat Gaikwad Firing: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर आता त्यांच्या समर्थकांमध्ये सोशल वॉर सुरू झाल्याचं दिसतंय. दोन्हींचे समर्थक सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करत आहेत.
MLA Ganpat Gaikwad Firing
MLA Ganpat Gaikwad FiringSaam Tv
Published On

Ganpat Gaikwad Mahesh Gaikwad Supporters Social War

भाजपा आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड व त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. तर हल्ल्यात जखमी झालेले महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेनंतर कल्याण पूर्वेत तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड व त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर गोळीबार (MLA Ganpat Gaikwad Firing) केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड राहुल पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

कल्याण पूर्वेकडे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. तर आता सोशल मीडियावर मात्र पुन्हा एकदा दोघांच्या समर्थकांकडून समर्थन, पाठिंबा देणारे रिल्स व्हायरल (social media reels) केले जात आहेत.

आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते रिल्स व्हायरल करत आहेत, तर दुसरीकडे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना पाठिंबा देणारे रिल्स देखील महेश गायकवाड यांचे समर्थक (Mahesh Gaikwad Supporters) सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देणारे हे रील्स वायरल होत आहेत. त्यामुळं आता सोशल मीडियावर देखील वातावरण तापायला लागलंय.

कल्याण पूर्वेत तणावपूर्ण शांतता

याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड व त्यांच्या दोन साथीदाराना अटक करण्यात (Kalyan Politics) आली. आमदार गायकवाड यांच्यासह दोघे आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर कल्याण पूर्वेत तणावपूर्ण शांतता आहे. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कल्याण पूर्वेत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

सोशल मीडियावर मात्र भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थन करणारे रिल्स त्यांच्या (Ganpat Gaikwad Supporters) समर्थकांकडून वायरल होऊ लागले आहेत, तर दुसरीकडे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना पाठिंबा देणारे रिल्स देखील व्हायरल होत आहेत. शिवसेना भाजपाच्या नेत्यांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र, समर्थकांकडून अप्रत्यक्षरीत्या एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देणारे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे या समर्थकांमध्ये सोशल वॉर सुरू झाल्याचं दिसून येतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com