Kalyan Crime News Saam TV
क्राईम

Kalyan Crime News: प्रसादाचं आमिष दाखवून 7 वर्षांच्या चिमुकलीसोबत भयंकर कृत्य; घटनेनं कल्याण हादरलं

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख

Kalyan:

कल्याणमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रसादाचे आमिष दाखवत घरी बोलावत एका नराधमाने ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलाय. ही संतापजनक घटना कल्याण पूर्व परिसरात घडलीये. रामलखन असे या नराधामचे नाव असून कोळशेवाडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

सात वर्षीय मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. यावेळी शेजारी राहणारा रामलखन मुलीजवळ आला. रामलखन त्याच परिसरात राहणारा असल्याने मुलगी रामलखन याला ओळखत होती. ओळखीचा फायदा घेत रामलखने मुलीला मी तुला प्रसाद खायला देतो असे सागत घरी नेले. घरात नेऊन मुलीवर त्याने अत्याचार केला.

या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली आहे. या घटनेमुळे मुलगी घाबरली तिने घडलेला प्रकार घरी कुटुंबीयांना सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी रामलखनला अटक केली आहे.

आरोपी व्यक्ती हमालीचे काम करतो. तो घरात एकटाच राहतो. पोलिसांनी आज त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने रामलखन याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी हेमंत ढोले करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

SCROLL FOR NEXT