Kalyan News Saam TV
क्राईम

Kalyan News: भरबाजारात विकत होता गावठी कट्टा; सराईत गुन्हेगाराला कोळशेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News: पोलिसांना एक इसम आनंदवाडी परिसरात संशयीतरित्या फिरत असल्याचं आढळून आला. गावठी कट्टा विकण्यासाठी तोआला होता. कोळशेवाडी पोलिसांनी त्याला अटक केलीये.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, कल्याण

Kolsewadi Police Station:

गावठी कट्टा विक्री करण्यासाठी कल्याणमध्ये आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दानिश असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. दानिशने उत्तरप्रदेशहून हा गावठी कट्टा आणला होता. कल्याणमध्ये हा गावठी कट्टा विकण्यासाठी आला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याण कोळसवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिनकर पगारे व त्यांचे पथक रात्रीच्या सुमारास कल्याण पूर्व आनंदवाडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान पोलिसांना एक इसम या परिसरात गावठी कट्टा विकण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना एक इसम आनंदवाडी परिसरात संशयीतरित्या फिरत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तात्काळ त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला जागीच जेरबंद केले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा आढळला. त्याच्याजवळ चौकशी केली असता त्याचं नाव दानिश असून त्याने यूपी येथून हा कट्टा विकण्यासाठी आणला होता. कल्याणमध्ये तो ग्राहक शोधत असतानाच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्याच्या जवळून गावठी कट्टा हस्तगत केलाय.

कल्याणमधील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. वडिलांच्या हत्येनंतर मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलीये. काही महिन्यापूर्वी संतोष सरकटे यांची हत्या झाल्याने या प्रकरणी त्यांचा मुलगा सागर सरकटे याने तक्रार नोंदवली होती. मात्र आता मुलालाही जीवे ठार करण्याच्या धमक्या येतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT