Kalyan Crime News Saam tv
क्राईम

Kalyan Crime News: पत्नी, मुलाची गळा दाबून हत्या, आत्महत्येचा प्रयत्न फसल्यानंतर व्यावसायिक फरार

Kalyan Crime News: व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षांच्या मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण शहरात घडली आहे. दीपक गायकवाड असे या क्रूर पतीचे नाव असून तो फरार झाला आहे.

Sandeep Gawade

अभिजित देशमुख

Kalyan Crime News

व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षांच्या मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण शहरात घडली आहे. दीपक गायकवाड असे या क्रूर पतीचे नाव असून तो फरार झाला आहे. त्याची कल्याण शहरात नानूज वर्ल्ड नावाने खेळण्याची दुकाने आहेत. दीपकने स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे.

कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन नंबर तीन येथील ओम दिपावली इमारतीत दीपक त्याची पत्नी अश्वीनी आणि सात वर्षाचा मुलगा आदिराज याच्यासोबत राहतो. दरम्यान आज दुपारी त्याने त्याच्या नातेवाईकाला फोन करून पत्नी आणि मुलाची हत्या केली. तसेच स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. नातवाईकांनी दिपक चे घर गाठले असता त्यांना घरातील दृष्य पाहून धक्काच बसला. अश्विनी व सात वर्षाचा मुलगा आदिराजचा मृतदेह दिसून आला. तर दीपक पसार झाला होता .

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना देण्यात आल्यानंतर महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अश्विनी व आदिराजचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविले. दीपकची कल्याण शहरात नानूस वर्ल्ड नावाने महागड्या खेळण्याची दुकाने आहेत. या प्रकरणाचा महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे . पोलीस दीपक चा शोध घेत आहेत. दरम्यान दीपकने असं का केलं. हे त्याच्या अटकेनंतरच उघड होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Saturday Horoscope: या ४ राशींच्या आयुष्यात आज महत्त्वाचे बदल घडणार; काम, पैसा आणि नात्यांबाबत मिळणार खास संकेत

डॉल्बीवर पोलिसांचा दणका; डॉल्बी सिस्टीम मालकांवर १५ गुन्हे दाखल, सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! मध्य रेल्वे चालवणार ४१८ 'स्पेशल' ट्रेन्स; तुमच्या मार्गावरील एक्सप्रेस कोणती?

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव २०२६ साठी ४१८ विशेष गाड्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT