kalamba police arrests one after four passed away from same family in tirzada yavatmal Saam Digital
क्राईम

Yavatmal Crime News : यवतमाळला जावयाचा प्रताप; पत्नीसह सास-याला अन् मेहुण्याला संपवलं

या घटनेमुळे यवतमाळ जिल्हा पूरता हादरुन गेला आहे.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News :

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा (kalamba taluka tirzada) येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा कुटुंबातील सदस्यानेच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाेलिसांनी या प्रकरणी गोविंद विरचंद पवार यास अटक केली आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ही घटना पारधी बेड्यावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. पत्नीच्या चारित्र्यावरून हत्याकांडाचा थरार घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी घटनेची पाहणी केली.

या घटनेत गाेविंद पवार याचा सासरा पंडित भाेसले, मेहूणा ज्ञानेश्वर भोसले आणि सुनील भोसले, पत्नी रेखा यांचा मृत्यू झाला आहे. पवार याची सासू रुखमा या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कळंब पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंड यांनी घटनास्थळी जाऊन गाेविंद पवार यास अटक केली. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी साम टीव्हीला दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT