Jammu and Kashmir Saam TV
क्राईम

Jammu and Kashmir: निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार; मशिदीत नमाज पठण करताना केली हत्या

Retired Police Officer Shot: कोणी काही करण्याआआधीच त्यांची बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली. यावेळी तेथे असलेल्या अन्य नागरिकांची पळापळ झाली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण

Ruchika Jadhav

Jammu and Kashmir Crime News:

जम्मू-काश्मीरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आलीये. मशिदीमध्ये नमाज पठण करत असताना दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. सदर खटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मोहम्मद शफी मिर असं निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिक्षकांचं नाव आहे. मशिदीमध्ये अजान नमाज पठण करताना अचानक काही दहशतवाद्यांनी तेथे घोळका केला. कोणी काही करण्याआधीच त्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली. यावेळी तेथे असलेल्या अन्य नागरिकांची पळापळ झाली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण पसरलंय.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात मिर यांना गंभीर इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी सध्या या संपूर्ण परिसरास घेराव घातला आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

साल २०१२ मध्ये मिर एसएसपी म्हणून निवृत्त झाले होते. काश्मीर खोऱ्यातील ते रहिवासी होते. त्यांना वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) द्वारे सुरक्षा देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांची ही सूरक्षा काढून घेण्यात आली.

नुकतीच त्यांची वैयक्तिक सुरक्षा काढून घेण्यात आली होती. सुरक्षा काढल्यानंतर अशी काही घटना घडेल असे कुणालाही वाटले नव्हते. मिर यांच्या हत्येने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात श्रीनगरच्या इदगाह मशिदीजवळ एका पोलीस अधिकाऱ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. इन्स्पेक्टर मसरूर अहमद वानी श्रीनगरच्या ईदगाह मैदानावर स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत असताना ही घटना घडली होती. घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon Crime : गृहकर्जाची बँकेतून काढली एक लाख ९० हजारांची रोकड; चोरट्यानी संधी साधत लांबविली रोकड

Maharashtra News Live Updates: ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडणार; मातोश्रीतील बैठकीत ठाकरे गटाचा निर्धार

RCB Captain: RCB चा कॅप्टन ठरला! डू प्लेसिसनंतर या खेळाडूला मिळणार जबाबदारी

Raju Shetty : घोषणेप्रमाणे सर्व महिलांना लाभ मिळावा; लाडकी बहीण योजनेच्या नव्या निर्णयावरून राजू शेट्टी यांचा निशाणा

Manoj Jarange : फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भीत नाही; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT