Jalna’s Somthana village where a woman and her brother-in-law allegedly murdered her husband to continue their illicit relationship. Saam tv
क्राईम

Jalna Crime: वहिनीसोबतच्या प्रेमासाठी रक्ताचं नातं केलं परकं; कट आखत परमेश्वरला संपवलं

Jalna Crime: जालना जिल्ह्यातील सोमठाणा गावात एक धक्कादायक गुन्हा घडलाय. येथे एका महिलेने आणि तिच्या दिराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केली. पोलिसांनी त्यांचा नियोजित कट उघडकीस आणत, त्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Bharat Jadhav

अनैतिक संबंध कायम ठेवण्यासाठी एका महिलनं आपल्या पतीची हत्या त्याच्याच सख्ख्या भावाच्या मदतीन केली. ही धक्कादायक घटना जालन्यातील सोमठाणा येथे घडलीय. दरम्यान या प्रकरणी महिला आणि तिच्या दीराला अटक करण्यात आलीय. दीर ज्ञानेश्वर राम तायडे (वय २८) आणि मनिषा परमेश्वर तायडे (वय २५) अशी आरोपींची नावे आहेत. तर परमेश्वर राम तायडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा तायडे हिचे आणि तिच्या सख्ख्या दीरासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. पण त्यांच्या या अनैतिक संबंधांमध्ये मनिषाचा पती परमेश्वर राम तायडे अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून परमेश्वरला संपवण्याचं कट आखला .

नियोजित केलल्या कटानुसार दोघांनी १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर आणि मनिषाने परमेश्वरच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार केला. त्यात परमेश्वरचा जीव गेला. त्यानंतर, त्यांनी परमेश्वरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेह तलावात फेकण्याचा निर्णय घेतला. मृतदेह तलावात तरंगू नये म्हणून त्यांनी मृतदेह एका गोणीत भरला आणि त्याला दगड बांधून सोमठाणा तलावात फेकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism : मुंबईकरांनो गुलाबी थंडीत पिकनिक प्लान करा, बोरीवलीत आहे २ सुपरकूल ठिकाणं

Maharashtra Live News Update: धावत्या पीएमपीएमएल बसने घेतला अचानक पेट; दिवसभरातील आजची दुसरी घटना

Hair Fall Treatment: केस गळतीसाठी हा चमत्कारिक घरगुती मास्क नक्की लावा; केस होतील घनदाट, लांब आणि सिल्की

Monday Horoscope: पैशांची तंगी होईल दूर, ३ राशींच्या व्यक्तींचे कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics: नांदेडमध्ये मित्रपक्षाला अजितदादांचा दे धक्का; भाजप नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT