Crime News Saam Digital
क्राईम

Jalna Crime News : मन सुन्न करणारी घटना! पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, रागाच्या भरात बापाने पोटच्या ३ मुलांना विहिरीत फेकलं

Crime News : अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. गावातील विलास सोळुंके यांच्या शेतात असलेल्या विहिरीत तीन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना दिसले, त्यावेळी ही घटना उघडकीस आली.

Ruchika Jadhav

Jalna News :

जालना येथून मन सून्न करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयामुळे रागाच्या भरात एका पित्याने आपल्या तीन मुलांची हत्या केली. या घटनेप्रकरणी आरोपी संतोष धोंडीराम ताकवाले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. गावातील विलास सोळुंके यांच्या शेतात असलेल्या विहिरीत तीन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना दिसले, त्यावेळी ही घटना उघडकीस आली. शिवानी (वय ८), दिपाली (वय ६) आणि सोहम (वय १२) अशी मृत मुलांची नावे आहेत.

आपल्या पित्याकडूनच आपली हत्या होईल असा विचारही या मुलांच्या मनात कधी आला नसेल. मात्र डोक्यात संशय गेल्याने रागाच्या भरात संतोषने हे पाऊल उचलल्याचं दाखल तक्रारीवरून समजत आहे.

मुलांना बाहेर काढल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अंमलदार रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणी मुलांच्या पित्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, अशी शंका पतीच्या मनात होती. यावरून त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यातून पतीने आपल्या मुलांना संपवल्याचं फिर्यादिने म्हटलंय.

सदर घटनेनंतर संतोष गावातून फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. आई-वडिलांच्या भांडणाची शिक्षा निष्पाप मुलांना सहन करावी लागल्याने संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या १२ आयुक्तांच्या घरी ईडीची धाड

ऑफिसमध्ये घुसला अन् अंदाधुंद गोळीबार, स्वत:वरही झाडल्या गोळ्या, ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: रेव्ह पार्टीचा खरा सूत्रधार कोण? ठाकरेंनी अग्रलेखात थेट 'या' भाजप नेत्याचं नाव घेतलं

Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर ओसरणार! | VIDEO

Versova-Madh Bridge: २२ किमीचं अंतर फक्त ५ मिनिटात, वर्सोवा-मढदरम्यान तयार होणार केबल ब्रिज

SCROLL FOR NEXT