Crime News Saam tv
क्राईम

Crime: भररस्त्यात रक्तरंजित थरार, गोळ्या झाडून तरुणाची हत्या; जालना हादरले

Jalna Police: जालन्यामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. पैशाच्या वादातून तरुणीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली.

Priya More

अक्षय शिंदे, जालना

जालन्यामध्ये गोळ्या झाडून तरुणाची हत्या करण्यात आली. पैशाच्या वादातून ही घटना घडली. जालन्यातील अंबड चौफुली परिसर ही घटना घडली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी आत्महत्येचा बनाव रचला होता. पोलिसांच्या तपासामध्ये ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे उघडकीस आले. दोन संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात पैशाच्या वादातून एका ३० वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरामध्ये शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सागर धानोरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान या आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हत्या करून आत्महत्येचा बनाव केला होता.

मात्र पोलिसांच्या तपासामध्ये ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कल्याण भोजने आणि कमलेश झाडीवाले या संशयित आरोपींना अटक केली. त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान या हत्या प्रकरणांमध्ये अजून काही आरोपींचा सहभाग आहे का? याबाबत जालना पोलिसांकडून तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

वांगचुक रुग्णालयात, CJPच्या आंदोलनाचं काय? अभिजीत दिपके करणार अन्नत्याग आंदोलन

बिश्नोई गँगच्या रडारवर आमिर खान, तिसरं लग्न आणि धमकी...आमिर खान खरंच लव्ह जिहादी?

SCROLL FOR NEXT