Jalgaon Firing:  Saamtv
क्राईम

Jalgaon Crime: दुहेरी हत्याकांडाने भुसावळ शहर हादरलं! माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार

Jalgaon Firing: जळगावच्या भुसावळ शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारामध्ये माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू झाला असून भयंकर हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव, ता. ३० मे २०२४

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर गोळीबाराच्या घटनेने हादरुन गेले आहे. भुसावळ शहरातील जुना सातारा रोड परिसरातील मरी माता मंदिराजवळ दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या वेळी झालेल्या गोळीबारामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे शहरातील मरी माता मंदिराजवळ कारमध्ये बसलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

दरम्यान, पुणे शहरातील सांगवी परिसरातही एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिपक कदम असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT