Chopda taluka Father shoots daughter and son in law  Saam Tv News
क्राईम

Jalgaon News : प्रेमविवाहानं बाप संतापला, गर्भवती मुलीसह जावयावर गोळीबार; उच्च शिक्षित मुलीचा हल्ल्यात मृत्यू

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने मुलीवर आणि जावयावर गोळीबार केलाय. यात मुलीचा मृत्यू झालाय. प्रेमविवाह केल्यानं रागातून बापानं गर्भवती असलेल्या मुलीला संपवलं.

Prashant Patil

जळगाव : समाज व्यवस्था आता पुढारलेली आहे. जातीपातीच्या भिंती गळून पडतायेत. मात्र असं असूनही अनेक कुटुंबात प्रेमविवाहाला तीव्र विरोध होतोय. हे वास्तव आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपड्यातील हत्याकांडानं हीच गोष्ट अधोरेखीत केलीय. संतप्त बापानं पोटच्या मुलीला गोळी मारुन संपवलंय. ऑनर किलींगच्या या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय. सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण मांगले यांना मुलगी तृप्तीचा प्रेमविवाह मान्य नव्हता.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर मध्ये राहणारी तृप्ती वैद्यकीय शिक्षणानिमित्त पुण्यात होती. डी. वाय.पाटील कॉलेजमध्ये ती शिकत होती. इथूनच तिच्या प्रेम कहाणीला सुरुवात होते. पुण्यात राहणारा आणि नातेवाईकच असलेल्या अविनाश वाघ या तरुणाशी तिचे सुर जुळतात. अविनाश एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. दोघंही लग्नाचा निर्णय घेतात. मात्र तृप्तीच्या वडीलांचा याला तीव्र विरोध असतो. हा विरोध झुगारून तृप्तीने एक वर्षांपूर्वी अविनाशशी लग्न केले होतं. पुण्यात दोघांचा संसार सुरू होता. मात्र बापाच्या मनातील द्वेषाची आग धुमसत होती. तृप्ती चोपड्यात आल्यावर वडील किरण मांगलेंनी डाव साधलाच.

अविनाश वाघ याच्या बहिणीचं चोपड्यामध्ये लग्न होतं. यासाठी अविनाश आणि तृप्ती हे दोघेही पुण्यावरून चोपडा येथे आले होते. तृप्तीला कल्पना नव्हती. आपण पुन्हा कधीच पुण्याला परतणार नाही. गंभीर बाब म्हणजे तृप्ती चार महिन्यांची गर्भवती होती. पण बापाला दया आली नाही. वाघ कुटुंबाच्या हळदीच्या कार्यक्रमात येऊन किरण मांगले यांनी गोळी मारुन तृप्तीची हत्या केली. या गोळीबारात जावई अविनाश गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर जमावाने किरण मांगलेंना पकडुन चोप दिला. त्यात ते गंभीर जखमी झालेत. नातेवाईक असूनही वाघ आणि मांगले कुटुंबात वैर होते. हेच वैर तृप्तीच्या जीवावर उठलं. प्रेमानं जग जिंकता येते. मात्र एका निष्ठूर बापाला प्रेमाची भाषा समजली नाही. त्यामुळेच एका प्रेमकहाणीचा रक्तरंजीत अंत झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT