Jalgaon A One Hotel youth murder Saam Tv News
क्राईम

Jalgaon Crime : बायको-नवऱ्यात सतत वाद, मध्यरात्री जावयाला रस्त्यात गाठलं, लेकीच्या कुटुंबानेच कुंकू पुसलं; दोन मुलं पोरकी

Jalgaon Murder News : अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी आणि तीच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद निर्माण होता. सातत्याने ती माहेरी येत जात असायची काही दिवसांपासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहत होता.

Prashant Patil

जळगाव : जळगाव जिल्ह्यात हत्येचं सत्र काही करता थांबत नाहीय. यातच काल रात्री कौटुंबिक वादातून एक तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे यामुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर कालिका माता मंदिर भागाच्या पुढे एका ३० वर्षीय तरुणाची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना काल शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.

या हत्येप्रकरणी पोलीस स्टेशनला हत्येचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून संशयित आरोपींच्या शोधावर पोलीस लागले आहेत. जळगाव शहरातील नामांकित कालिका माता मंदिर परिसरात ही हत्येची घटना घडली आहे. आकाश पंडीत सोनार (वय ३०, रा. अयोध्या नगर, जळगाव) असं मयत तरुणाचं नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, २ मुलं असा परिवार आहे. तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये गाडी भरण्याचं एजंट म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता.

दरम्यान, अनेक महिन्यांपासून आकाशचा पत्नी आणि तिच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद सुरु होता. सातत्याने ती माहेरी येत जात असायची काही दिवसांपासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहत होता. दोघांच्या घरी सतत कौटुंबिक वाद सुरू असायचा. काल शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी आकाशला रस्त्यात धरलं. कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केलं सोबत दोन राऊंड बंदुकीचे फायर केले.

आकाशला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे त्याला तपासून मृत घोषित केलं. दरम्यान, रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते. ४ संशयीत तरुणांची नावं समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT