Jalandhar News Saam Digital
क्राईम

Panjab Crime News: क्रुरतेचा कळस! कार थांबवण्याचा इशारा केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास नेले फरफटत; घटना CCTV मध्ये कैद

Jalandhar News : पंजाबमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कामावर तैनात असलेल्या एएसआयला वेगवान कारने धडक दिल्यानंतर फरफटत नेल्याची घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Car Driver Hit The Policeman

पंजाबमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कामावर तैनात असलेल्या एएसआयला वेगवान कारने धडक दिल्यानंतर फरफटत नेल्याची घटना घडली. या घटनेत एएसआय गंभीर जखमी झाला आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील जालंधर मोगा नॅशनल हायवेवर गुरुवारी(ता.११)रोजी घडली आहे. जखमी झालेल्या पोलिसांचे नाव सुरजीत असे आहे. हे बाजवा कलानमधील रहिवासी आहेत.धडक मारणारा कार चालक फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

घटनेच्या दिवशी सुरजीत यांची ड्युटी गुरुवारी शाहकोटमधील सतलज नदीला लागून असलेल्या कावन पट्टण गावातील हायटेक ब्लॉकवर लावण्यात आली होती. त्याच दरम्यान दुपारच्या सुमारास सुरजीत यांनी एका कार चालकास थांबण्याचा इशारा केला होता. परंतू कार चालकाने कार थांबण्याच्या जागी कारचा वेग वाढवला.सुरजीत यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कार चालकाने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर जाऊन पडले.

घटनेने आरोपीने कार तिथेच सोडून पळ काढलाय. या घटनेच गंभीर जखमी झालेल्या एएसआयला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची कार जप्त करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT