Jaipur Tinder App Case Saam Digital
क्राईम

Jaipur Tinder App Case: "बाबा, मला वाचवा": डेटींग अ‍ॅपच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाची कशी झाली हत्या?

Jaipur Tinder App Case: ऑनलाईन डेटींग अ‍ॅप टींडरवर प्रीया सेठ सोबत झालेल्या ओळखीनंतर २८ वर्षांच्या दुष्यंत शर्माचं आयुष्य जणू शिखरावरच पोहोचलं होतं. जवळपास तीन महिने डेटींग अ‍ॅपवर बोलणं सुरू होतं. त्यानंतर मात्र दोघांनी समोरासमोर भेटण्यांच ठरवलं आणि घात झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jaipur Tinder App Case

ऑनलाईन डेटींग अ‍ॅप टींडरवर प्रीया सेठ सोबत झालेल्या ओळखीनंतर २८ वर्षांच्या दुष्यंत शर्माचं आयुष्य जणू शिखरावरच पोहोचलं होतं. दोघांच्या आवडीनिवडी समान होत्या. जवळपास तीन महिने डेटींग अ‍ॅपवर बोलणं सुरू होतं. त्यानंतर मात्र दोघांनी समोरासमोर भेटण्यांच ठरवलं. २७ वर्षांच्या या तरुणीने दुष्यंतला भाड्याने घेतलेल्या घरी बोलवलं आणि दुष्यंतने कोणताही विचार न करता ते मान्यही केलं.

फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू झालेलं हे नातं दोन खोट्या गोष्टींवर बनलं होतं, ज्याची बर्बादी निश्चित होती. विवाहित असलेल्या दुष्यंतने विवान कोहली या नावाने टींडरवर बनावट अकाऊंट उघडलं. यात त्याने स्वत: दिल्लीतील एक करोडपती उद्योगपती असल्याची माहिती दिली होती. तर दुसरीकडे प्रीयाने केवळ दुष्यंतच अपहरण करून खंडणी मिळवण्याच्या उद्देशाने त्याच्याशी बोलणं सुरू केलं होतं.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठरल्याप्रमाणे दुष्यंत प्रीयाला भेटायला गेला होता. मात्र प्रीयाचे दोन साथीदार दीक्षांत कामरा आणि लक्ष्य वालिया आधीच तिथे दाखल झाले होते. दुष्यंतने खोलीत प्रवेश करताच प्रीयाने त्या दोघांच्या मदतीने त्याला पकडलं आणि कोंडून ठेवलं. मात्र प्रीया आणि तिच्या साथीदारांनाही ते फसल्याची जाणिव झाली. कारण दिल्लीचा उद्योगपती त्यांनी जेवढी अपेक्षा केली होती तेवढा तो श्रीमंत निघाला नाही.

आपण फसल्याचं त्यांना समजल्यानंतर त्यांना राग अनावर झाला. त्यांनी त्याच्या घरी फोन करून दुष्यंतच्या बदल्यात मोठी रक्कम मागीतली. दुष्यंतचे घरच्या परिस्थिती नसल्यामुळे १० लाख रुपयांची रक्कम जमा करणं त्यांना जमलं नाही. दुष्यंत आपल्या वडिलांना, बाबा काहीही करा आणि पैसे द्या, नाहीतर हे लोक मला मारून टाकतील, असं ओरडून ओरडून सांगत होता. तरीही त्यांनी कसेतरी तीन लाख रुपये देण्याची विनंती केली त्यामुळे त्या तिघांनी दुष्यंतवर चाकूने अनेक वार केले. त्यानंतर उशीने तोंड दाबून त्याची हत्या केली. प्रीयाने दुष्यंतचं डेबिटकार्ड काढून घेतलं होतं आणि त्याला कार्डचा पीन देण्यास भाग पाडलं. त्याच्या वडिलांनी त्याच्या अकाऊंटवर तीन लाख रुपये जमा केल्यानंतर त्यांनी २० हजार रुपये काढून घेतले. मात्र हे सर्व कृ्त्य उघड होण्याच्या भीतीने त्यांनी दुष्यंतची हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT