Rajasthan Crime News  
क्राईम

Crime News: एक्स बॉयफ्रेंडनं आधी काढला फोटो; गिफ्ट दिलं नंतर नवरदेवावर केले चाकूने सपासप वार, Watch Video

Rajasthan Crime News : सध्या सोशल मीडियावर राजस्थानमधील लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या वधूचा जुना प्रियकर तिच्या लग्नात पोहोचला. गिफ्ट दिल्यानंतर त्याने नवरदेवावर चाकूने वार केलेत.

Bharat Jadhav

जयपूर: प्रेमभंग झालेल्या एका प्रेयसीच्या लग्नात जात भरस्टेजवर नवरदेवावर चाकू हल्ला केल्याची घटना राजस्थानमधील भिलवाडा गावात घडलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणाची नोंद घेतलीय. प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हटलं जातं. पण काही प्रेमवीर या म्हणीला फारच गांभीर्यानं घेत टोकाचं पाऊल उचलतात.

राजस्थानमधील भिलवाडा येथील असाच भयंकर प्रकार घडलाय. येथील एका मुलीच्या लग्नात तिचा एक्स बॉयफ्रेंड लग्नात आला. नवरदेव नवरीच्या स्टेजवर जात त्याने नवरीला शुभेच्छाही दिल्या. फोटो काढला, त्यानंतर नवरदेवाकडे गेल्यानंतर त्यानं नवरदेवावर चाकूने सपासप वार केले.

नवरदेवाच्या डोक्यावर पगडी असल्यामुळे मोठी दुखापत झाली नाही. पण या घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यातील वातावरण तापलेय. नवरदेवावर चाकू हल्ला झाल्यानंतर नवरीचा भाऊ विशाल याने या हल्ल्याबाबत पोलिसांत तक्रार दिली. नवरीचा भाऊ विशाल म्हणाला की, दोन दिवसांपूर्वी माझ्या बहिणीचं लग्न भिलवाडा येथे महेंद्र सेन याच्यासोबत होत होते. लग्न झाल्यानंतर वधू आणि नवरदेव स्टेजवर बसले होते. त्यावेळी शंकरलाल आला त्यानंतर शुभेच्छा दिल्या आणि अचानक नवरदेवावर हल्ला केला.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव शंकर लाल भारती असं आहे. त्याचा शोध घेतला जातोय. आरोपी शंकरलाल याच्यासोबत लग्नात आलेल्या त्यांच्या मित्रांनीही गोंधळ घातला. तोडफोड केली. नवरी भीलवाडा येथे सरकारी शाळेत शिक्षिका आहे. आरोपी शंकरलाल दोन वर्षांपूर्वी याच शाळेत शिक्षक होता. त्यानंतर त्याची बदली झाली होती, पण त्या दोन वर्षांमध्ये शंकरालाल याचं सूत जुळलं होतं. पण ब्रेकअपनंतर मुलीचं लग्न इतर मुलाबरोबर झालं. ही गोष्ट शंकरलाल याला रुचली नाही त्यानंतर त्याने राडा केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Kelkar: केसात गजरा अन् हिरवी साडी, समृद्धी केळकरच्या मेहंदीचे फोटो पाहिलेत का?

No Handshake मुळे भारतावर कारवाई होणार? वाचा ICC चा नियम काय सांगतो

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरसह वसई-विरार शहरात पावसाची रिपरिप

Nikhil Bane : फायनली ती माझ्या आयुष्यात आली; हास्यजत्रा फेम अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Majalgaon Rain : माजलगावमध्ये ढगफुटी; गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली, गावांमध्ये पाण्याचा वेढा

SCROLL FOR NEXT