Washim News Saam tv
क्राईम

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, धावत्या ट्रकमधून व्हॅक्सिनचा मुद्देमाल जप्त

Washim News : समृद्धी महामार्गावरील २.४३ कोटींच्या व्हॅक्सिन चोरीचा उलगडा वाशिम पोलिसांनी दीड महिन्यानंतर केला. आंतरराज्यीय टोळीतील सहा आरोपी अटकेत असून ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Alisha Khedekar

  • समृद्धी महामार्गावरील २.४३ कोटींच्या व्हॅक्सिन चोरीचा उलगडा

  • वाशिम पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीतील सहा आरोपींना पकडलं

  • ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपींनी ११ गुन्ह्यांची कबुली दिली

  • महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरातमध्येही आरोपींच्या टोळीने चोरी केली

समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या रोड रॉबरीच्या घटनेचा उलगडा करण्यात तब्बल दीड महिन्यानंतर वाशिम पोलिसांना करण्यात यश आलं असून, यात आंतरराज्यीय टोळीच्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आल आहे. त्यांच्याकडून ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे.

२३ जुलैला वाशिमच्या कारंजा भागातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकमधून व्हॅक्सिनचे ४६ बॉक्स चोरी करण्यात आले होते. या बॉक्सची किंमत तब्बल २ कोटी ४३ लाख ८६ हजार ६८४ रुपये इतकी होती. या प्रकरणी कारंजाच्या ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि कारंजा ग्रामीण पोलीस यांनी संयुक्त तपास सुरू करत. तब्बल ८५ हजार वाहनांची तपासणी करून पोलिसांनी संशयित ट्रक शोधून काढला. त्यानंतर हे आरोपी गोवा येथे अशाच प्रकारच्या दुसऱ्या रॉबरी साठी जात असताना वाशिमच्या कारंजा परिसरात पोलिसांनी धाडसी कारवाई करून चार आरोपींना अटक केली. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे मध्य प्रदेशातील देवास येथे मुख्य सूत्रधार राजेंद्र चौहान आणि त्याचा साथीदार भारत घुडावद यांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील राहणारे आहेत.

कारवाईदरम्यान इलेक्ट्रॉनिक कटर, ट्रक व स्कॉर्पिओसह ३८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरातमध्ये अशा प्रकारच्या चोरी केल्याचं कबूल केलं आहे. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात असेच ११ गुन्हे दाखल असून पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत देखील यांच्यावर कारवाई केली होती. सध्या सर्व आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कस्टडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT