Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर 2.50 कोटींची रॉबरी, ट्रकमधून व्हॅक्सिन चोरी | VIDEO

Washim News : वाशिमच्या कारंजा जवळ एका वातानुकूलित ट्रक मधून महागड्या व्हॅक्सिन चोरीला गेल आहे. ही चोरी लाख,दहा लाखांची नसून तब्बल अडीच कोटी रुपयांची चोरी झाल्याच उघड झाले आहे.

समृद्धी महामार्गावर अपघात, टोल दरवाढ यानंतर आता आणखी एका धक्कादायक घटनेची चर्चा सुरू झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरात समृद्धी महामार्गावर अॅम्बियंट वातानुकूलित ट्रकमधून तब्बल अडीच कोटी रुपयांच्या महागड्या व्हॅक्सिन्स चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

ही चोरी एखाद्या सामान्य चोरट्यांनी केलेली नसून, पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेवर आणि वाहतूक यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. लाखो नाही तर कोट्यवधींची चोरी झाली आहे. ट्रकचालक आणि कंपनी व्यवस्थापनाचीही चौकशी सुरू असून, लवकरच या चोरीचा तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com